बॉलिवूड किंग शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘पठाण’नंतर शाहरुख ‘जवान’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अटली कुमार शाहरुखच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच अटली कुमारने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अटली आणि प्रिया मोहन यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे.

अटली कुमारने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे. “आई-वडील होण्याची भावना वेगळीच आहे. आम्हाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. पालकत्वाचा प्रवास आजपासून सुरू होत आहे”, असं कॅप्शन त्याने पोस्टला दिलं आहे.

हेही वाचा>> Video: जयदीपने बुटातील पाणी चहाच्या कपमध्ये टाकलं अन्…; ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल

अटली कुमार व प्रियाने २०१४ साली लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर नऊ वर्षांनी त्यांच्या घरी पाळणा हलला आहे. मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी व चाहत्यांनी अटली व प्रियाला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा>> वनिता खरातच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात, अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्यानेही हातावर काढली मेहेंदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अटली कुमार दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक आहे. ‘जवान’ चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसह विजय सेतूपथी, नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.