बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम हा लोकप्रिय अभिनेता आहे. जॉनने त्याच्या करिअरची सुरुवात ही मॉडेलिंगपासून केली होती. त्यानंतर त्याने बोल्ड चित्रपट करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. दरम्यान, जॉनने बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतसोबत सुद्धा बोल्ड सीन दिले आहेत. या दोघांनी एकता कपूरच्या ‘शूटआउट अॅट वडाळा’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण करत असताना जॉन अचानक इतका अग्रेसिव्ह झाला की कंगनाला दुखाप होऊन तिच्या रक्ताच्या थारा निघू लागल्या होत्या.

खरतरं, कंगनासोबतच्या एका गाण्यातील सेक्स सीनच्या शूटिंगदरम्यान जॉन त्याच्या भूमिकेत एवढा मग्न झाला होता. त्याच्यामुळे कंगनाला दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला, हे जॉनला त्यावेळी कळलेही नव्हते. जॉनचे चित्रपटात कंगनासोबतचे २ रोमांटिक गाणी आहेत. त्यापैकी एका गाण्यात जॉनला अग्रेसिव्ह व्हायचे होते आणि कंगनासोबत काही इंटिमेट सीन द्यायचे होते. जेव्हा हे गाणं प्रदर्शित झालं तेव्हा दोघांमध्ये असलेली केमिस्ट्रि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली होती. पण कंगनासोबत इंटिमेट सीन करताना जॉन त्याच्या भूमिकेत एवढा मग्न झाला होता की त्याने कंगनाचा हात जोरात पकडला.

आणखी वाचा : फोटो काढण्यासाठी आलेल्या पोलिसाला हटकल्यानंतर ; अक्षयने केलेल्या कृत्याचे होतयं कौतुक

‘ये जुनून’ या गाण्यात कंगनाने साडी नेसली होती आणि हातात बांगड्या होत्या. एका वृत्तानुसार, या गाण्याच्या शूटिंगमध्ये जॉन इतका हरवला होता की त्याने कंगनाच्या हातातील बांगडी इतक्या वेगाने पकडली की तिच्या हाताची बांगडी तुटली आणि तिच्या हातातून रक्त येऊ लागले. पण जेव्हा जॉनच्या हे लक्षात आले तेव्हा त्याने लगेच कंगनाची माफी मागितली.

आणखी वाचा : सुशांत सिंह राजपुतच्या बहिणीचा बोल्ड फोटो पाहिल्यानंतर नेटकरी संतप्त म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर दोघेही त्यांच्या भूमिकेत एवढे गुंतलेले होते की त्यामुळे ही घटना घडली असे तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले. त्यानंतर कंगना जॉनला काही बोलली नाही आणि त्यांनी गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं. हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटात कंगना आणि जॉन व्यतिरिक्त मनोज बाजपेयी, सोनू सूद, तुषार कपूर आणि अनिल कपूर देखील मुख्य भूमिकेत आहेत.