Jolly Llb 3 Box Office Collection Day 2 : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी त्यांच्या ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कमाईच्या बाबतीत ‘जॉली एलएलबी ३’ने चांगली सुरुवात केली आहे. या चित्रपटात अक्षय आणि अर्शद वारसी मुख्य भूमिकेत आहेत.

सुभाष कपूर दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगले कलेक्शन केले; परंतु त्याच्या आधीच्या ‘जॉली एलएलबी २’चा विक्रम तो मोडू शकला नाही आणि आता त्याचे दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. शनिवारी चित्रपटाने किती कमाई केली ते जाणून घेऊया.

‘सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी १२.७५ कोटी आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी २० कोटी कमावले. त्यामुळे ‘जॉली एलएलबी ३’चा एकूण व्यवसाय ३२.७५ कोटी झाला आहे. आशा आहे की, या आठवड्यातही त्याची कमाई कायम राहील. कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करणे यशस्वी होत आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा बहुप्रतीक्षित ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट शुक्रवारी (१९ सप्टेंबर) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट सुभाष कपूर यांनी दिग्दर्शित केला आहे.

‘जॉली एलएलबी’ हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अर्शद वारसी, बोमन इराणी, अमृता राव व सौरभ शुक्ला दिसले होते. त्यानंतर सुभाष कपूर त्याचा सीक्वेल घेऊन आले, त्यावेळी निर्मात्यांचा अर्शदशी वाद सुरू होता, ज्यामुळे त्याने चित्रपट केला नाही. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी अक्षयला चित्रपटात घेतले. त्याच्याबरोबर हुमा कुरेशी, सौरभ शुक्ला व अनु कपूरदेखील दिसले. यावेळी तिसऱ्या भागात जॉली म्हणजेच अर्शद वारसी, अक्षय, हुमा कुरेशी, अमृता राव व सौरभ शुक्ला हे दोघेही दिसले आहेत.

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अक्षय कुमारच्या मागील काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे ‘जॉली एलएलबी ३’कडून अपेक्षा जास्त आहेत. अभिनेत्याचे ‘भूत बंगला’, ‘हैवान’ व ‘वेलकम ३’सारखे चित्रपटदेखील येणार आहेत.