बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा काल वाढदिवस होता. आर्यनचा काल २४ वा वाढदिवस होता. आर्यनच्या वाढदिवसानिमित्ताने त्याला त्याच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, सगळ्यांचे लक्ष हे शाहरुखची बेस्ट फ्रेंड जुही चावलाने केलेल्या पोस्टने वेधले आहे.

जुहीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर करत आर्यनला शुभेच्छा दिल्या आहेत. एवढंच नाही तर जुहीने एक संकल्प देखील केला आहे. जुहीने एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत जुहीची मुलं आणि त्यांच्यासोबत आर्यन आणि सुहाना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत “आजच्या खास प्रसंगी माझ्या पर्सनल अल्बममधून आणखी एक खास फोटो. आर्यनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आमच्या प्रार्थना नेहमीप्रमाणे तुझ्या पाठीशी आहेत. देवाचा आशीर्वाज तुझ्यावर सदैव असू दे आणि तो तुझे रक्षण आणि मार्गदर्शन करेल. मी तुझ्या नावाने ५०० झाडं लावण्याचा संकल्प करते”, अशा आशयाचे कॅप्शन जुहीने त्या फोटोला दिले आहे.

आणखी वाचा : “तुम्ही लग्नाच्या पहिल्या रात्री काय केले?”; अभिनेत्रीने संतापून पत्रकारालाचा विचारला हा विचित्र प्रश्न

आणखी वाचा : “२०१४ पूर्वी कंगना हृतिक आणि आदित्य पांचोलीच्या ताब्यात होती…”, म्हणतं अभिनेत्याने उडवली खिल्ली

याआधी जूहीने शाहरुख खानच्या 56 व्या वाढदिवसानिमित्ताने असाच संकल्प केला होता. जुहीने शाहरुख आणि तिच्या अनेक फोटोंचे कोलाज शेअर करत शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जुही आणि शाहरुख हे खूप चांगले मित्र आहेत. जुही आर्यनच्या अटकेनंतर संपूर्णवेळ शाहरुखच्या कुटुंबासोबत होती.