Kajol Broke No Kissing Policy : बॉलीवूड अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिची ‘द ट्रायल २’ ही सीरिज आज (१९ सप्टेंबर) जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाली. या सीरिजमध्ये काजोल पुन्हा एकदा वकिलाची भूमिका साकारत आहे. नोयोनिका सेनगुप्ताच्या तिच्या भूमिकेने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सीरिजमधील एक सीन व्हायरल होत आहे. या सीरिजमध्ये तिने तिच्या ऑन-स्क्रीन पतीला किस केले आहे.
काजोल बॉलीवूडमध्ये प्रवेश केल्यापासून तिच्या कोणत्याही चित्रपटात किसिंग सीन करत नव्हती. पण, ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रवेश केल्यानंतर तिने ‘नो-किसिंग पॉलिसी’ मोडली. काजोलचा पहिला किसिंग सीन ‘द ट्रायल’ च्या पहिल्या सीझनमध्ये दाखवण्यात आला होता, जिथे तिने तिच्या ऑनस्क्रीन पतीला, जो एक पाकिस्तानी अभिनेता होता, किस केले होते.
आता सीरिजचा दुसरा सीझन आला आहे आणि काजोलचा एक किसिंग सीनदेखील आहे. शेवटच्या भागात अभिनेत्री तिच्या ऑनस्क्रीन पतीला किस करताना दिसत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या सीनमध्ये जिशु आणि काजोल यांच्यातील एक भावनिक दृश्य दाखवण्यात आले आहे, जिथे ते एकमेकांना किस करताना दिसत आहेत.
काजोलने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ‘नो किसिंग पॉलिसी’ने केली होती. तिने तिच्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीत कधीही किसिंग किंवा इंटीमेट सीन केले नाही. तिने सांगितले होते की तिला असे सीन करण्यास सोयीस्कर वाटत नव्हते, परंतु आता काळ बदलला आहे, म्हणून तिने हे सीन केले.
बॉलीवूडमध्ये काजोलला ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. काजोलने तिच्या ३३ वर्षांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. शाहरुख खान आणि काजोलची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली. सध्या काजोल तिच्या आगामी ‘द ट्रायल २’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.
‘द ट्रायल २’ बद्दल बोलायचं झालं तर सहा भागांच्या या सीरिजमध्ये काजोल तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यांमध्ये अडकलेली दिसते. काजोलने पुन्हा एकदा तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे.