आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारा कमाल राशिद खान म्हणजेच केआरके बॉलिवूडमधील सेलिब्रिटींवर टीका करण्यात आघाडीवर आहे. सलमान खान आणि मिक्का सिंहवर जोरदार टीका केल्यानंतर आता केआरकेने बॉलिवूडची क्विन कगना रणौतकडे मोर्चा वळवला आहे. कंगना रणौतच्या पासपोर्ट रिन्यूअल प्रकरणावरून केआरकेने कंगनावर निशाणा साधला आहे.

केआरकेने एक भला मोठा व्हिडीओ शेअर करत कंगना रणौतला सुनावलं आहे. केआरकेने त्याच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हीडीओ शेअर केलाय. यात त्याने कंगनाच्या सुपरहिट ‘क्वीन’ सिनेमातील तिचा प्रसिद्ध झालेला रडण्याच्या सीनवरून मिमिक्री केली आहे. यात केआरकेने कंगनाचा ‘१२ वी नापास’ असा उल्लेख केलाय. एवढचं नाही तर कंगनाने द्वेष करण्यात पीएचडी केल्याचं तो म्हणालाय. तर कंगनाने काही तरी सेटिंग करत ४ राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केले असल्याचा आरोप त्याने केला आहे.

हे देखील वाचा: “ती भूमिका न साकारल्याचा कायम खेद राहिल” मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर अक्षय कुमारची भावूक पोस्ट

केआरकेने त्याच्या व्हिडीओत कंगनाची थट्टा केलीय. “१२ वी नापास..वादात पीएचडी आणि ४ वेळा रष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या कंगना रणौतचा पासपोर्ट रिन्यू का झाला नाही बरं” असं म्हणत त्याने कंगनाची टेर खेचली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे कंगना रणौतचं पासपोर्ट प्रकरण?

कंगना रणौतला ‘धाडक’ सिनेमाच्या शूटिंगसाठी हंगेरी देशात जायचं होतं. मात्र कंगनाचा पासपोर्ट सप्टेंबरपर्यंतच वैध असल्याने तिने पारपोर्ट प्राधिकरणात रिन्यूअल अर्ज केला. मात्र कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा असल्याने कंगनाचा पासपोर्ट रिन्यू करण्यास प्राधिकरणाने नकार दिला. त्यानंतर कंगनाने पासपोर्ट रिन्यूअल करण्यात यावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र तिथेही तिच्या पदरी निराशा पडली. न्यायालयाने कंगनाला फटकारत सुनावणी २५ जूनला पुढे ढकलली आहे.