अभिनेता संचारी विजय हे आपल्या बाइकवरून घरी येत असताना अचानक त्यांची बाइक घसरून मोठा अपघात घडला होता. शुक्रवारी रात्री हा अपघात घडल्यानंतर ताबडतोब त्यांना जवळच्या रूग्णालयात नेण्यात आलं. यात त्यांच्या मेंदूच्या उजव्या बाजूला जबर मार बसल्यानं ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील ४८ तास फार नाजुक असतील असंही डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यांच्या मेंदूवर आपत्कालीन शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. परंतू अखेर काळाने घाला घातला आणि उपचार सुरू असतानाच अभिनेता संचारी विजय यांचं निधन झालं. ते ३८ वर्षाचे होते.

अभिनेता संचारी विजयच्या निधनानंतर त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला. करोना काळात अभिनेता संचारी विजय हे वेगवेगळ्या माध्यमातून लोकांची मदत करताना दिसून आले होते. यूसायर या टीमसोबत काम करून त्यांनी करोनाबाधितांना ऑक्सिजन देखील पुरवलं होतं. लोकांच्या संकट काळात मदतीला आलेले संचारी विजय यांच्यावरच काळाने घाला घातला.

कन्नड अभिनेता सुदिपने ट्विट करत संचारी विजय यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, ” संचारी विजयचा मृत्यू झाला हे खूपच दुःखद आणि निराशाजनक आहे. या लॉकडाउनपूर्वी त्याला फक्त दोनदाच भेटलो. त्याच्या पुढील चित्रपटाबद्दल उत्सुक होता, जो रिलीज होणार आहे. मी अतिशय दु:खी आहे. त्याच्या कुटूंबाच्या आणि मित्रांच्या दुःखात सहभागी आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कन्नड अभिनेता संचारी विजय हे कर्नाटकातील थिएटर सर्कलमधील एक सुप्रसिद्ध अभिनेते होते. ‘नानू अवनाल्ला … अवलू’ , ‘किलिंग वीरप्पन’ आणि ‘नाथीचरामी’ या चित्रपटांतील अभिनयाने त्यांनी लाखो प्रेक्षकांची मन जिंकली होती.