लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल प्रश्न विचारल्याने रचिता राम वादात, अभिनेत्रीवर बंदी घालण्याची कन्नड क्रांती दलाची मागणी

रचिताचा हा प्रश्न ऐकल्यानंतर परिषदेत असलेले पत्रकार थक्कच झाले.

rachita-ram

कन्नड अभिनेत्री रचिता राम पत्रकार परिषदेत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आली असून तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘लव्ह यू रच्चू ‘ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रचिताला एका पत्रकाराने तिच्या बोल्ड सीनवर प्रश्न विचारला होता. यावर रचितानेच त्याला “लग्नाच्या पहिल्या रात्री तुम्ही काय केले?” असा प्रश्न विचारला. यानंतर ती चांगलीच चर्चेत आली. रचिताच्या या प्रश्नावर अनेकांनी संताप व्यक्त केलाय.

दरम्यान, कन्नड क्रांती दलाने रचिताने तिच्या विधानाबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. तसचं कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सला देखील अभिनेत्रीवर बंदी घालण्यास सांगितले आहे. “रतिचाने केलेलं विधान हे संस्कृतीला शोभणारं नसून त्यामुळे राज्याची प्रतिमा खराब झाली आहे.” असं कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष तेजस्वी नागलिंगस्वामी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्यामुळे आता सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच रचिताच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय.

‘लव्ह यू रच्चू ‘ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, जेव्हा रचिताला तिच्या या इंटिमेट सीन देण्याच्या निर्णयावर प्रश्न विचारला. तेव्हा रचिता म्हणाली, स्क्रिप्टमध्ये जे होतं ते तिने केले. ‘लव यू रच्चू’ मधले रचिता आणि अजय रावचे बोल्ड सीन सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर यावरच प्रश्न विचारल्यानंतर रचिताला राग आला. रचिता रागात म्हणाली, “इथे बरेच लोक विवाहित आहेत. कुणालाही लाजवण्याचा माझा हेतू नाही. मी तुम्हांला सर्वसाधारणपणे विचारतेय… मला सांगा लग्नानंतरच्या पहिल्या रात्री लोक काय करतात? लग्नाच्या रात्री तुम्ही काय केले?” रचिताचा हा प्रश्न ऐकल्यानंतर परिषदेत असलेले पत्रकार थक्कच झाले.

राजकुमार राव आणि पत्रलेखाची लग्नपत्रिका व्हायरल, केव्हा आणि कुठे होणार लग्न ?

बोल्ड सीन करण्याबाबत रचिताने आधीच स्पष्टीकरण दिले होते की, जर मी ते सीन केले असतील तर त्यामागे कारण आहे. हे चित्रपट पाहिल्यानंतर कळेल. असं ती म्हणाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kannada kranthi dal demanded rachita ram public apology for her statemen first night kpw

ताज्या बातम्या