ट्रोलिंगचा कहर… आता १०८ सूर्यनमस्कार घातल्याने करीनाला ट्रोलर्सने केलं लक्ष्य; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

करीनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

kareena kapoor khan, kareena kapoor trolled, surya namaskar,
करीनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. बऱ्याच वेळा करीना तिच्या फिटनेसचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकताच करीनाने योगा करतानाचा तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

करीनाने हा व्हिडीओ तिच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत करीनाने गुलाबी रंगाची स्पोर्ट्स ब्रा परिधान केली आहे. करीना या व्हिडीओत योगा करताना दिसत आहे. करीनाने १०८ वेळा सुर्यनमस्कार करतानाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत “१०८ सुर्यनमस्कार झाले. कृतज्ञ आणि आभारी आहे. तर आज रात्री पंपकिन पाय खाण्यासाठी तयार आहे,” असे कॅप्शन करीनाने दिलं आहे.

आणखी वाचा : शत्रुघ्न सिन्हांची मुलगी होणार सलीम खान यांची सून? सोनाक्षीने केला तिच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा

करीनाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तिची स्तुती केली आहे. तर एक नेटकरी तिला ट्रोल करत म्हणाला, “मुस्लिमांमध्ये योग करणं गुन्हा आहे. असं सगळ्यासमोर नको करूस…नाही तर कोणता मौलवी फतवा जारी करेल.”

आणखी वाचा : निलेश साबळेने पाया पडून मागितली नारायण राणेंची माफी; जाणून घ्या कारण

करीना लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात करीनासोबत आमिर खान मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूडच चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या व्यतिरिक्त करीना ‘तख्त’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात करीनासोबत रणवीर सिंह, विकी कौशल, आलिया भट्ट, भूमि पेडनेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर दिसणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kareena kapoor did surya namaskar for 108 times then got trolled video viral dcp

ताज्या बातम्या