बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या करीनाच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. करीना कपूर नुकतीच तिची मैत्रीण मलायका अरोराला भेटायला गेली होती. तिथून निघताना करीनासोबत असं काही घडलं की, त्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. एवढंच नाही या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

व्हिडीओ जर्नलिस्ट विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर करीना कपूरचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘फोटोग्राफर्स असण्याची दुसरी बाजू अशी देखील आहे की, सेलिब्रेटींचे फोटो क्लिक करताना कधी कधी अशी जोखीम घ्यावी लागते. आज आमच्या सोबतच्या एका मुलाचा पाय करीना कपूरच्या कारखाली चिरडला. करीना तिची मैत्रीण मलायका भेटून निघत असताना ही घटना घडली.’

आणखी वाचा- ‘ढोलिडा’ गाण्यावर मायराचा धम्माल डान्स, Video एकदा पाहाच

करीना कपूरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात करीना कपूर मलायका अरोराच्या अपार्टमेंटमधून बाहेर निघताना दिसत आहे. त्यानंतर अचानक एका व्यक्ती वेदनेनं ‘माझा पाय… माझा पाय…’ असं ओरडत असल्याचं ऐकू येतं. करीना कपूरचे फोटो क्लिक करण्यासाठी आलेल्या एका फोटोग्राफरचा पाय कारखाली अडकल्यानं तो ओरडत होता. हे पाहून करीना त्याला सांभाळायला आणि काळजी घ्यायला सांगते आणि जोरात आपल्या ड्रायव्हरला, ‘मागे जा यार…’ असं चिडून ओरडताना दिसत आहे. यानंतर करीना सर्वा फोटोग्राफर्सना सांगते, ‘तुम्ही असं धावत येऊ नका यार. का धावता तुम्ही. काळजी घ्या.’

आणखी वाचा- सलमान- अक्षय- सैफ पोहोचले शाहरुख खानच्या ‘मन्नत’वर, वाचा नेमकं काय घडलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ मलायकाच्या घराबाहेरील आहे. २ एप्रिलला मलायकाचा कार अपघात झाला होता. तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बॉलिवूड सेलिब्रेटी तिला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचले होते. त्यात करीना कपूरचाही समावेश होता.