बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीना ही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. करीना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याचवेळा चर्चेत राहते. करीनाने सोशल मीडियावर तिची मोठी नणंद सबा पतौडीचा (Saba Pataudi) फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबत एक खास गिफ्ट देखील दिले आहे.

करीनाने इन्स्टाग्राम स्टोरीवरून फोटो शेअर करत सबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. १ मे रोजी सबाने तिचाा ४६ वा वाढदिवस साजरा केला आहे. या निमित्ताने करीना आणि सैफने (Saif Ali Khan) तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत गिफ्ट देखील पाठवलं आहे. सबाच्या वाढदिवसाच्या दिवशी फोटो शेअर करत “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सबा डार्लिंग, खूप खूप प्रेम”, असे कॅप्शन करीनाने दिले होते. या फोटोला रिपोस्ट करत सबाने करीना आणि सैफचे आभार मानले आहे. सबाला वाढदिवसाची भेट म्हणून सैफ आणि करीनाने केक, फुलांचा गुच्छ आणि एक पत्र दिले होते. तर या पत्रात “प्रिय सबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एक अप्रतिम आणि शुगर फ्री केकचा आनंद घे. बेबो”, असे करीनाने लिहिले होते.

आणखी वाचा : “आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : “क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले!”, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी वादावर हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : “मी एका कपलसोबत ‘Throuple Relationship’मध्ये होते”; सायशा शिंदेने केला धक्कादायक खुलासा

सबा अली खान ही एक ज्वेलरी डिझायनर आहे आणि २०११ मध्ये तिचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांच्या निधनानंतर, सबाचे नाव हे भोपाळच्या शाही ट्रस्टच्या संरक्षक म्हणून देण्यात आले. तर सबाने आजपर्यंत लग्न केलेले नाही. औकाफ-ए-शाही असे त्या ट्रस्टचे नाव आहे. सबा या ट्रस्टची मुतवल्ली (मशिदीच्या मालमत्तेची व्यवस्था किंवा व्यवस्थापन करणारी व्यक्ती) असून ती भोपाळ आणि सौदी अरेबियातील मालमत्तातेची देखरेख करते.

आणखी वाचा : Lock Upp : पूनम पांडेने पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर काढले कपडे, सगळ्यांसमोर केली अंघोळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वडिलांच्या मृत्यूनंतर सैफ पतौडीचा नवाब म्हणून ओळखू लागला, तर सबाची भोपाळ ट्रस्टच्या मुख्य विश्वस्तपदी निवड झाली. रियासत संपल्यानंतर औकाफ-ए-शाहीच्या प्रमुख बनलेली ती देशातील पहिली महिला आहे.