करीना कपूर खान आणि शाहिद कपूरचा ‘जब वी मेट’ चित्रपट तुम्हाला आठवतच असेल. करीना-शाहिदने यामध्ये केलेलं काम आणि त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री कमालीची होती. तसेच या दोघांची प्रेमकथा रुपेरी पडद्यावर सहजरित्या खुलली. प्रेक्षकांना हा चित्रपट आजही लक्षात आहे. करीनाने साकारलेली गीत आणि शाहिदने आदित्य नावाच्या मुलाची भूमिका अगदी उत्तमरित्या साकारली. पण अभिनेता बॉबी देओलने याबाबत एक खुलासा केला होता.

‘जब वी मेट’ चित्रपटादरम्यान करीना-शाहिद रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. खरंतर बॉबी देओलला हा चित्रपट करायचा होता. मात्र करीनामुळे त्याला या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही. आजतकच्या वृत्तानुसार, बॉबीनेच एका मुलाखतीदरम्यान याबाबत खुलासा केला होता.

तो म्हणाला, “‘सोचा ना था’ चित्रपट पाहिल्यानंतर दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्याबरोबर काम करण्याची माझी इच्छा होती. ‘जब वी मेट’बाबत इम्तियाजशी मी बोलणं देखील केलं. तेव्हा या चित्रपटाचं नाव ‘गीत’ होतं. गीत या भूमिकेसाठी प्रीति झिंटाशी इम्तियाजने संवाद साधला होता. करीनाला त्यांनी या चित्रपटासाठी विचारताच तिने नकार दिला. पण प्रत्यक्षात भलतंच घडलं.”

आणखी वाचा – Video : रस्त्यालगतच्या दुकानामध्येच काम करू लागला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, नेटकरी म्हणाले, “माणूसकी जपली अन्…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“इम्तियाज अली यांच्या या चित्रपटामध्ये करीना काम करत असल्याचं मला समजलं. तसेच करीनाने माझ्याबरोबर काम न करता ‘जब वी मेट’दरम्यानचा तिचा बॉयफ्रेंड शाहिदबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटसृष्टीमध्ये असे प्रकार ही घडतात हे तेव्हा मला समजलं.” इम्तियाजवर कोणताच राग नसल्याचंही बॉबीचं म्हणणं आहे. तसेच आजही हे दोघं उत्तम मित्र आहेत.