बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीनाचे लाखो चाहते आहेत. करीना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. करीनाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

करीना तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सैफ आणि तिच्या मुलांसोबत मालदिवला गेली आहे. करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत करीनाने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. त्यावर तिने एक निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. या मिरर सेल्फीमध्ये करीना सुंदर दिसत आहे. हा फोटो शेअर करत ‘चला उन्हाळा संपला.. हिवाळा सुरु झाला’, असे कॅप्शन करीनाने दिले आहे.

आणखी वाचा : नागा चैतन्यच्या ‘पहिल्या पत्नी’ विषयी समांथाने केला होता खुलासा

kareena kapoor khan, kareena kapoor instagram,
करीनाने इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून हा फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा : “पुरुषांमधील ‘हे’ ३ गुण मला आकर्षित करतात”, मलायकाने केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करीनाचा २१ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी करीना पती सैफ आणि मुलांसोबत मालदिवला गेली होती. वाढदिवस साजरा करून झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत करीनाने चाहत्यांचे शुभेच्छा दिल्याने आभार मानले आहे. करीना लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात करीना आमिर खानसोबत दिसणार आहे.