बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान गेल्या काही दिवसांपासून धाकटा मुलगा जहांगीरच्या नावामुळे चर्चेत होती. त्या आधी करीनाने सीतेच्या भूमिकेसाठी १२ कोटी रुपये मानधन म्हणून मागितल्याने चर्चेत आली होती. त्यावेळी तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. याविषय करीनाने स्पष्टीकरण किंवा चर्चा केली नव्हती. मात्र, आता करीनाने एका मुलाखतीत यावर वक्तव्य केलं आहे.

करीनाने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत करीनाने सीतेच्या भूमिकेसाठी मागितलेल्या मानधनाविषयी चर्चा केली आहे. “करीनाचे पुढचे प्रोजेक्ट्स कोणते आहेत? यावर्षाच्या अखेरीस ‘लाल सिंग’ चड्ढा प्रदर्शित होणार. त्यानंतर १२ कोटी रुपये मानधनाच्या भूमिकेची चर्चा होती. तू १२ कोटी रुपये मानधन मागितलेस, इतर अभिनेत्रींनी तुला पाठिंबा दिला होता” असे करीनाला विचारण्यात आले. त्यावर करीनाने होकारार्थी मान हलवली आणि हे खरं आहे असे सांगितले.

आणखी वाचा : मुलीच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अनिल कपूरचा ‘झक्कास’ डान्स व्हायरल

या आधी सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी करीनाला सीतेच्या भूमिकेवरून ट्रोल केले होते. काही नेटकरी म्हणाले होते की ‘करीनाने तिच्या मानधनाची रक्कम वाढवत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.’ यावेळी पूजा हेगडे, प्रियामनी आणि तापसी पन्नू यांच्यासोबत अनेक अभिनेत्रींनी करीनाला पाठिंबा दिला.

आणखी वाचा : रिया कपूरच्या रिसेप्शन पार्टीमध्ये जान्हवी आणि खूशी कपूरला पाहून नेटकरी संतापले

‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, करीना एका चित्रपटासाठी सहा ते आठ कोटी रुपये मानधन घेते. मात्र, सीतेच्या भूमिकेसाठी तिने करीनाने मानधनाची रक्कम वाढवत १२ कोटी रुपये केली आहे. तर या चित्रपटासाठी करीनाला ८ ते १० महिन्यांचा कालावधी लागणार होता.