scorecardresearch

Premium

“७५ वर्षांची म्हातारी दिसतेयस”; करीना कपूरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

तैमूरच्या जन्मानंतरही करीना कपूरचं वजन प्रचंड वाढलं होतं. एका मुलाखतीत करीनाने तिचं वजनं १८ किलो वाढल्याचा खुलासा केला होता.

kareena-kapoor-troll
(Photo-instagram@kareenakapoorkhan)

बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. २१ फेब्रुवारी २०२१ ला करीनाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर करीनाला अनेकदा विविध ठिकाणी स्पॉट करण्यात आलंय. तैमूरच्या जन्मानंतर काही काळातच मोठी मेहनत घेऊन करीनाने वजन कमी केलं होतं. यंदा मात्र करीनात चाहत्यांना काहीच फरक जाणवलेला नाही. करीनाने पुन्हा एकदा ट्रान्सफॉर्मेशनसाठी सुरुवात देखील केली आहे. इन्स्टाग्रामवर करीनाने तिचे काही वर्कआउटचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. असं असलं तरी करीनात कोणताही बदल झालेला दिसत नसल्याने  नेटकऱ्यांनी करीनाला ट्रोल केलंय.

आतंराष्ट्रीय योगा दिनानिमित्त म्हणजेच २१ जूनला करीनाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत करीना योग करताना दिसत आहे. २००६ सालापासून म्हणजचे ‘टशन’ आणि ‘जब वी मेट’ या सिनेमाच्या वेळी योग सुरु केल्याच करीना या पोस्टमध्ये म्हणाली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणाली, “दोन मुलांना जन्म दिल्यानंतर आणि आता प्रसूतीच्या चार महिन्यांनंतर मी खूप थकले होते. पुन्हा सर्व सुरु करताना खूप त्रास होत आहे.मात्र आज मी पुन्हा एकदा हळूहळू सुरुवात करत आहे.” असं ती म्हणाली होती. करीनाने शेअर केलेल्या फोटोत तिचा नो मेकअप लूक पाहायला मिळतोय. मात्र या लूकमुळेच अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.

swara bhaskar
“माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काम…”; स्वरा भास्करने शेअर केला प्रसूतीदरम्यानचा अनुभव; म्हणाली, “पिढ्यान् पिढ्या बायका..”
akshay kumar pens emotional note
“मुली एवढ्या लवकर का मोठ्या होतात?”, लाडक्या लेकीसाठी अक्षय कुमारची भावुक पोस्ट, म्हणाला…
trisha krishna
साऊथ सुपस्टार त्रिशा कृष्णन लवकरच बांधणार लग्नगाठ? चर्चांना उधाण
tanushree dutta adil khan allegations on rakhi sawant
“तिच्यामुळे दोन मुलांनी आत्महत्या केल्या,” तनुश्री दत्ताचे राखी सावंतवर गंभीर आरोप; म्हणाली, “इतके धर्म बदलूनही…”

हे देखील वाचा: मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी राहुल वैद्य आणि दिशा परमार अडकणार लग्न बंधनात

एक युजर म्हणला, “तिचा चेहरा पहा, किती वय दिसतंय.” तर दुसरा युजर म्हणाला, “कोण अफवा पसरवतंय की तू खूप सुंदर दिसतेस” तर आणखी एक युजर म्हणाला, “तू ७५ वर्षांची आजीबाई दिसतेयस”

kareena-kapoor-troll
(Photo-instagram@kareenakapoorkhan)

करीना कपूरने १२ किलो वजन कमी केलं होतं

तैमूरच्या जन्मानंतरही करीना कपूरचं वजन प्रचंड वाढलं होतं. एका मुलाखतीत करीनाने तिचं वजनं त्यावेळी १८ किलो वाढल्याचा खुलासा केला होता. मात्र तैमूरच्या जन्मानंतर अवघ्या ५ महिन्यात करीनाने १२ किलो वजन कमी केलं होतं. यासाठी तिचं अनेकांनी कौतुक केलं होतं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kareena kapoor trolled for post delivery transformation change netizens said looking old like grand mother kpw

First published on: 06-07-2021 at 13:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×