“प्रत्येक बंगालीमध्ये काली…”, राणी मुखर्जीचे वक्तव्य ऐकून बिग बींची बोलती बंद

राणी मुखर्जीच्या एका वक्तव्यामुळे अमिताभ बच्चन यांची बोलतीच बंद झाली.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन या शोचे सूत्रसंचालन करताना दिसतात. ‘कौन बनेगा करोडपती’ या शो मध्ये नुकतंच ‘बंटी और बबली २’ या चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ हे उपस्थित होते. यावेळी राणी मुखर्जीच्या एका वक्तव्यामुळे अमिताभ बच्चन यांची बोलतीच बंद झाली.

नुकतंच सोनी टीव्हीने केबीसी १३ च्या आगामी भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे. यात सिद्धांत चतुर्वेदी हा अमिताभ यांच्यासमोर रॅप गाताना दिसत आहे. त्यानंतर थोड्या वेळाने राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांची केबीसीच्या मंचावर एंट्री होते. केबीसीच्या मंचावर पोहोचताच सैफ अली खान म्हणाला, “सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ यांनी आम्हाला एका खोलीत बंद केले होते,” असे त्यांनी सांगितले.यानंतर सैफ अली खान आणि राणी मुखर्जी हे दोघेही ‘हम तुम’ या चित्रपटातील ‘सांसो को सांसो’ मे या गाण्यावर रोमँटिंक डान्स करताना दिसतात.

यानंतर अमिताभ बच्चन यांनी सैफ अली खान आणि राणी मुखर्जी या दोघांनाही एक प्रश्न विचारला. चित्रीकरणाच्या सेटवर सर्वात जास्त राग कोणाला येतो? असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर राणीने स्वत:चे नाव घेतले आणि पुढे म्हणाली, “प्रत्येक बंगालीमध्ये काली माता ही दडलेली असते.” राणीचे हे उत्तर ऐकताच अमिताभ बच्चन हे चकित होऊन तिच्याकडे बघतात. यानंतर बिग बी सैफकडे बघतात आणि “आता कोणताही प्रश्न नाही”, असे गमतीत म्हणतात. दरम्यान याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

“जेव्हा बिग बींनी कपिल शर्माची मागितली होती माफी”; शेअर केला किस्सा

येत्या १९ नोव्हेंबरला ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी राणी आणि सैफने ‘हम तुम’, ‘तारा रम पम’ आणि ‘थोडा प्यार थोडा मॅजिक’ चित्रपटात एक दिसले होते. आता जवळपास १२ वर्षांनंतर ते पुन्हा ‘बंटी और बबली २’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kaun banega crorepati 13 amitabh bachchan speechless as rani mukerji says every bengali has a kali within them nrp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!