छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या शोचे १४ वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यंदाच्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून केबीसीचे १४ वे पर्व सुरु होणार आहे. हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमात अनेक प्रश्नांची उत्तर देऊन लाखो रुपये जिंकता येतात. पण हे प्रश्न नेमकं कोण तयार करतं? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. नुकतंच याचे उत्तर समोर आले आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ या शोला बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे विशेष महत्व प्राप्त झालं आहे. बॉलिवू़डचे महानायक हा शो होस्ट करत असल्यामुळे या शोला चार चाँद लागले आहेत . या शोमध्ये आलेल्या प्रत्येक स्पर्धकासोबत बिग बी मोठ्या विनम्रतेने आणि दिलखुलास अंदाजात संवाद साधत असतात. नुकतंच केबीसीमधील प्रश्न कोण तयार करतात याबाबतचा उलगडा झाला आहे.

केबीसीचे प्रश्न कोण तयार करतात?

नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातील प्रश्न तयार करण्याचे काम हे तज्ञांच्या एका पॅनलद्वारे केले जाते. या पॅनलची नेमणूक ही निर्मात्यांद्वारे केली जाते. यात केबीसीचा निर्माता सिद्धार्थ बसूचाही सहभाग असतो. सिद्धार्थ बसू हा या शोचा निर्माता आहे. तसेच तो उत्तम क्विझ मास्टर देखील आहे.

पाहा व्हिडीओ –

सिद्धार्थ बसू आणि त्यांची टीम विविध गोष्टींचा विचार हे प्रश्न तयार करते. हे प्रश्न वेगवेगळ्या विषयांशी संबंधित असतात. यात भारतीय संस्कृती आणि पौराणिक कथा, खेळ यांसारख्या विविध विषयांचा समावेश असतो. तसेच चालू घडामोडी, बातम्या, कार्यक्रम, भारत आणि जगाचा इतिहास, मनोरंजन आणि स्पर्धकाचा छंद याच्याशी संबंधित प्रश्नांचा देखील या प्रश्नांमध्ये समावेश केला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान केबीसीचे १४ वे पर्व लवकरच सुरु होणार आहे. येत्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून हा कार्यक्रम प्रदर्शित होणार असल्याचे बोललं जात आहे. या कार्यक्रमाचे अनेक प्रोमो सध्या व्हायरल झाले आहेत. मात्र अद्याप हा कार्यक्रम कधी सुरु होणार याची नेमकी तारीख समोर आलेली नाही.