‘कौन बनेगा करोडपती १३’ या शोमध्ये देशभरातील स्पर्धक सहभाग घेत आपलं नशीब आजमावत असतात. या शोच्या गुरुवारच्या भागामध्ये महाराष्ट्रामधील कल्पना दत्ता यांना हॉटसीटवर बसण्याची संधी मिळाली. कल्पना या गृहिणी असून काही वर्षांपूर्वी त्या एका कंपनीत सेल्स हेडच्या पदावर काम करत होत्या. तसचं कल्पना या फिटनेस प्रेमीदेखील आहेत. या भागात कल्पना यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारत अगदी उत्तमरिच्या प्रश्नांची उत्तर दिली. मात्र २५ लाख रुपयांसाठी विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर येत नसल्याने कल्पना यांनी गेम सोडला.

कल्पना यांनी मोठ्या हुशारीने कठीण प्रश्नांची उत्तर दिली. कोणतीही लाइफ लाइन न वापरता त्यांनी १ लाख ६० हजारांपर्यंतचा टप्पा गाठला. मात्र दहाव्या प्रश्नाला कल्पना यांनी दोन लाइफ लाइनचा वापर केला आणि त्यांनी तीन लाख २० हजार रुपयांचा टप्पा पार केला. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी १२व्या प्रश्नाला ऑडियंस पोल ही लाइफ लाइन वापरली. मात्र ऑडियंसच्या उत्तराने त्यांचं समाधान न झाल्याने त्यांनी त्यांची शेवटची एक्सपर्ट लाइफ लाइन वापरली आणि १२ लाख ५० हजार रुपयांचा टप्पा पार केला. यानंतर १३ व्या प्रश्नाला मात्र कल्पना यांच्याकडे कोणतीच लाइफ लाइन शिल्लक नव्हती. शिवाय या प्रश्नातं उत्तर त्यांना ठाऊकही नव्हत. जागतिक राजकारणाशी संबंधीत या प्रश्नावर कल्पना यांना गेम सोडावा लागला. कल्पना यांना विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता का?

पहा फोटो: “हा काही सुधारणार नाही”; रणवीर सिंहच्या हटके हेअर स्टाइलवर भन्नाट मीम्स व्हायरल

हे देखील वाचा: “भावा तुझा शर्ट तिला दे”; ब्रालेट परिधान केल्याने अभिनेत्री राधिका मदान ट्रोल

हा होता २५ लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न:

जानेवारी २०२१ मध्ये कायकाल्लास पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोणता देश जगातील एकमेव असा देश बनला जिथे पंतप्रधान आणि राष्ट्रपती दोघेही महिला आहेत?A: इरिट्रिया

B: एस्टोनिया
C: लातविया
D: लिथुआनिया

या प्रश्नामुळे कल्पना यांचा गोंधळ उडाला आणि त्यांनी गेम सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कल्पना १२ लाख ५० हजार रुपये या शोमध्ये जिंकल्या आहेत. या प्रश्नातं योग्य उत्तर पर्याय B: एस्टोनिया असं होतं. कल्पना यांनी हे उत्तर दिलं असतं तर त्या २५ लाख रुपये जिंकल्या असत्या.