केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. ३० जूनला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात वंदना गुप्ते यांनी साकारलेली भूमिका खूप गाजत आहे.

चित्रपटात दाखवल्याप्रमाणे वंदना गुप्ते खऱ्या आयुष्यातही तेवढ्याच डॅशिंग आहेत. अशाच या डॅशिंग ज्येष्ठ अभिनेत्रीचा आज ७१ वा वाढदिवस आहे. त्याच निमित्ताने ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी वंदना गुप्ते यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत हटके स्टाइलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा : “इतरांना दोष देण्यात…” रोहित शेट्टी ‘सर्कस’च्या अपयशाबद्दल स्पष्टच बोलला

सध्या हे दोघेही त्यांच्या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. वंदना गुप्ते यांचा एका बाईकवर जबरदस्त पोज देतानाचा एक फोटो केदार शिंदे यांनी शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इतकंच नव्हे तर हा फोटो शेअर करताना त्यात केदार यांनी वंदना गुप्ते यांचा उल्लेख ‘माझी डॉन’ असा गंमतीत केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
kedar-shinde-post
फोटो : सोशल मीडिया

वंदना गुप्ते या त्यांच्या याच बेधडक स्वभावासाठीच ओळखल्या जातात. त्यांनी टेलिव्हिजन, चित्रपट तसेच रंगभूमीवर लोकांच्या कायम स्मरणात राहतील अशा भूमिका साकारल्या. नुकत्याच आलेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातीलही त्यांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. एका आठवड्यातच या चित्रपटाने १२.५० कोटींची कमाई केली आहे. तर अजूनही या चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू आहे.