बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या चर्चेत आलीय. अभिनेत्री कियाराने गेल्या काही काळात बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपट केले आहेत. यातील तिच्या अभिनयाचं देखील कौतुक केलं जातंय. नुकतंच रिलीज झालेल्या तिच्या ‘शेरशाह’ चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. कियाराने तिच्या छोट्याश्या करिअरमध्ये दोनदा ‘खिलाडी’ अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता शाहिद कपूर सोबत सुद्धा तिने चित्रपटात केलंय. इतकं यश मिळवून सुद्धा अभिनेत्री कियाराला ट्रोलर्सचा सामना करावा लागतोय. ‘शेरशाह’ चित्रपटातील तिच्या सुंदर लूकवरून सध्या तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येतंय. चित्रपटात सुंदर दिसण्यासाठी तिने प्लास्टिक सर्जरी केल्याचा आरोप करत सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला. त्यानंतर अभिनेत्री कियारा आडवाणीने या सर्व ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलंय.
अभिनेत्री कियारा आडवाणी नुकतीच अरबाज खानच्या ‘पिंच बाय अरबाज खान’ मध्ये पोहोचली. या शोमध्ये बोलताना कियाराने सर्व ट्रोलर्सना जबरदस्त उत्तर दिलंय. तिच्या या मुलाखतीचा पूर्ण एपिसोड टेलिकास्ट होण्याआधीच अरबाज खानने एपिसोडचा एक प्रोमो रिलीज केलाय. यात अरबाजन खानने तिच्यावर येणारे वेगवेगळ्या कमेंट्सबाबत विचारल्यानंतर किरायाने ट्रोलिंगबाबत आपलं मत व्यक्त केलं. तसंच तिच्यावर लागलेल्या ‘घमंडी’ टॅगबाबत देखील आपलं मौन सोडलंय.
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री कियारा आडवाणीला ट्रोल करत तिला ‘घमेंडी’ म्हटलं जातंय. काही जणांनी तिला अभिनेता अक्षय कुमारसोबत काम करण्याचा सल्ला दिला. काही जण तिला ‘मूर्ख बाई’ म्हणतात. तसंच तिने प्लास्टीक सर्जरी केल्याचा आरोप करत तिच्यावर टीका देखील करण्यात येतेय. या सगळ्या गोष्टींवर अखेर कियाराने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अरबाज खानच्या ‘पिंच सीजन 2’ मध्ये बोलताना कियारा आडवाणी म्हणाली, “मला असं वाटतं की हे सर्व कमेंट्स वाचत असताना हे कळलं पाहिजे की आपण नेमकी कुठे रेघ आखली पाहीजे.” तिच्या प्लास्टीक सर्जरीबाबत देखील तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी ती म्हणाली, “मी एका कार्यक्रमासाठी गेले होते… तिथे गेल्यानंतरचे जे फोटोज समोर आले, त्यावरून मी प्लास्टीक सर्जरी केल्याच्या चर्चांना सुरूवात झाली. त्यानंतर जे कमेंट्सचा भडीमार सुरू झालाय, तो पाहून तर आता स्वतःला खरंच असं वाटू लगालंय की मी नक्कीच प्लास्टीक सर्जरी केली असावी.”
अभिनेत्री कियारा आडवाणी अनेकदा ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करताना दिसून येत असते. पण काही कमेंट्स या तिला दुखावतात आणि मग त्याचा तिला मानसिक त्रास होतो.
यापूर्वी कियारा आडवाणीने अक्षय कुमारसोबत ‘गुड न्यूज’ आणि ‘लक्ष्मी’ या दोन चित्रपटात काम केलंय. ‘गुड न्यूज’ चित्रपटात ती दिलजीत दोसांझसोबत झळकली होती आणि अक्षय कुमारसोबत अभिनेत्री करीन कपूर झळकली होती. तिच्या आगामी चित्रपटाबाबत बोलायचं झालं तर लवकरच ती कार्तिक आर्यन सोबत ‘भूल भुलैया 2’ मध्ये आणि वरुण धवनसोबत ‘जुग जुग जियो’ आणि ‘मिस्टर लेले’ या चित्रपटात झळकणारेय.