बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ शोमध्ये अनिल कपूर आणि वरुण धवनने हजेरी लावली. या भागाचा प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दोघेही करणच्या प्रश्नांना मजेशीर पद्धतीने उत्तर देताना दिसत आहेत. अनिल कपूर आणि वरुण धवनसह करणने लग्न, रिलेशनशिप, मनोरंजन विश्वातील घडामोडींवर गप्पा मारल्या आहेत.

‘कॉफी विथ करण’ शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकरांना प्रश्न विचारून बोलतं करण्याबरोबरच तो त्यांच्यासह विविध मजेशीर खेळही खेळतो. या शोमधील रॅपिड फायर खेळात करणने विचारलेल्या प्रश्नांना सेकंदाचाही विलंब न करता पटकन उत्तर द्यायचे असते. वरुण धवनलाही करणने रॅपिड फायर खेळात प्रश्न विचारले. यातील जवळपास सगळ्याच प्रश्नांना त्याने क्षणभरही विचार न करता बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचं नाव घेत उत्तर दिलं.

हेही पाहा >> Photos : माणुसकी! ‘तो’ दाक्षिणात्य अभिनेता घरकाम करणाऱ्या महिलेच्या मुलाच्या लग्नाला आला अन्…

करणने वरुणला “सेल्फी घेण्याची आवड कोणाला आहे?, सगळ्यात जास्त गॉसिप कोण करतं?, चुकीची स्क्रिप्ट कोण निवडतं?, ओळख नसनाताही फ्लर्ट कोण करतं?”, हे प्रश्न विचारले. या प्रश्नांना वरुणने अर्जुन कपूर असं उत्तर दिलं. हे ऐकून अनिल कपूर वरुण धवनला म्हणाले, “तो माझा पुतण्या आहे”. त्यांनी असं म्हटल्यानंतर शोमध्ये हशा पिकला.

हेही वाचा >> ऋता दुर्गुळेला मराठी चित्रपटांची लॉटरी; ‘टाईमपास ३’च्या सुपरहिट यशानंतर नव्या भूमिकेत दिसणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कॉफी विथ करण ७’ मधील अनिल कपूर आणि वरुण धवन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा एपिसोड गुरुवारी १५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.