स्वत:ला चित्रपट समीक्षक म्हणून ओळखणारा केआरके अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. सध्या चर्चेत असलेल्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटावर टीका तर त्याने केलीच मात्र आमिर खानवर देखील तोंडसुख घेतलं आहे. एखादा कलाकार त्यांच्या रडारवर आला की तो कलाकार त्याच्या टीकेचे लक्ष्य बनतो. कधी चित्रपटातील कलाकारांवर तर कधी चित्रपट दिग्दर्शकाबद्दल. यावेळी त्यांच्या निशाण्यावर दिग्दर्शक-निर्माता आले आहेत.

केआरकेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत तो असं म्हणाला की बॉलिवूडला वाचवायचे असेल तर अशा दिग्दर्शक-निर्मात्यांना बंदी घातली पाहिजे ज्यांना हिंदी येत नाही. हिंदी चित्रपट बनवण्यासाठी कोणालाही इंग्रजीत काम करू देऊ नये. हिंदी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कोणालाही इंग्रजी बोलू देऊ नये.

तो एवढ्यावरच न थांबता म्हणाला की “आज मी सर्व फ्लॉप निर्माते आणि कलाकारांविरुद्ध बोलतोय, ज्यांना कलाकार म्हणून प्रेक्षक ओळखत नाहीत. संधी मिळाल्यास हे फ्लॉप निर्माते आणखीन ढीगभर फ्लॉप चित्रपट बनवतील. खरं हे आहे की बॉलिवूडमध्ये ९९% मूर्ख लोकांचा समावेश आहे ज्यांना चांगल्या किंवा वाईट स्क्रिप्टबद्दल काहीही माहिती नाही. फिल्म संस्थेने या सर्व मूर्खांना काढून टाकायला हवं.

केआरकेच्या या ट्विटचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कॉमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, “तुम्ही हिंदीसाठी एवढा आग्रह धरताय, पण तुम्ही हिंदीतच ट्विट केले आहे.” दुसर्‍याने व्यंगात्मक पद्धतीने लिहिले की, इतके सुंदर हिंदी लिहून तुम्ही हिंदीला जो आदर दिलात त्यासाठी हिंदी नेहमीच तुमची ऋणी राहील. तर एका यूजरने त्याच्या या पोस्टचे समर्थन केले आहे ‘तुम्ही योग्य बोलत आहात’ अशा पद्धतीने ट्विट करत त्याला पाठिंबा दिला आहे.

“मला संपवायला निघालेल्यांचा ६ महिन्यात…”, किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केआरके ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो अनेकवेळा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. मात्र तरीदेखील तो आपली मतं चित्रपटांचे समीक्षण आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर टाकतच असतो. केआरके स्वतः एक अभिनेता निर्माता आहे. प्रामुख्याने भोजपुरी चित्रपटात तो काम करतो. काही वर्षांपूर्वी आलेल्या एक व्हिलन ह्या चित्रपटात त्याने काम केले होते.