scorecardresearch

‘रणबीर कपूरने गहराइयांचा ट्रेलर पाहून…; अभिनेत्याने साधला दीपिकावर निशाणा

अभिनेत्याचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

KRK, Ranbir Kapoor, Gehraiyaan, Shakun Batra, Karan Johar, Deepika Padukone, Ananya Panday, Siddhant Chaturvedi, Dhairya Karwa, Naseeruddin Shah, Rajat Kapur, Gehraiyaan teaser, Gehraiyaan trailer, Gehraiyaan release date, Gehraiyaan Amazon Prime, Gehraiyaan Amazon Prime release date, Gehraiyaan OTT release date, केआरके, रणबीर कपूर, गेहराइयां,

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी हे त्यांचा आगामी चित्रपट ‘गहराइयां’मुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरमधील दीपिका आणि सिद्धांतमधील केमिस्ट्री चाहत्यांच्या विशेष पसंतीला देखील उतरत आहे. त्यांनी चित्रपटात काही बोल्ड सीन्स देखील दिले आहेत. आता या चित्रपटाचा ट्रेलर पाहाता एका अभिनेत्याने ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरचा उल्लेख केला आहे. त्याचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने दीपिकाचा ‘गहराइयां’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून ट्वीट केले आहे. कमाल आर खानचे प्रत्येक ट्वीट चर्चेचा विषय ठरते. विविध विषयांवर कोणीही विचारले नसताना हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक त्याची मते मांडताना दिसतो. सेलिब्रिटी त्याच्या ट्वीटकडे फारसे लक्ष देत नसले तरी नेटकरी मात्र त्याच्या ट्वीटची आतुरतेने वाट पाहात असतात. त्याला अनेक वेळा ट्रोल करतात. आता कमाल आर खानने दीपिकावर निशाणा साधला आहे.
आणखी वाचा : ‘गहराइयां’मध्ये सिद्धांत-दीपिकाचा बोल्ड सीन पाहून रणवीर म्हणाला…

‘रणबीर कपूरने गहराइयांचा ट्रेलर पाहून म्हटले असेल देवा तुझे मानापासून आभार! दीपूसोबत ब्रेकअप करुन तू मला वाचवले.. नाही तर आज माझी इज्जत गेली असती’ या आशयाचे ट्वीट केआरकेने केले आहे.

दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य कारवा यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अमेझॉन प्राइम व्हिडीओ’वर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन शकुन बत्रा करत आहेत तर करण जोहरचं धर्मा प्रॉडक्शन आणि व्हायकॉम १८ या चित्रपटाचे निर्माते आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Krk slams deepika padukone after watching gehraiyaan trailer and drags ranbir kapoor name avb

ताज्या बातम्या