बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. २ ऑक्टोबरला एनसीबीने केलेल्या छापेमारीत आर्यन खानला ताब्यात घेण्यात आलं होतं. आर्यन खानच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आर्यनच्या अटकेवर आता बॉलिवूड अभिनेत्री कुब्रा सैतने देखईल प्रतिक्रिया दिलीय.

‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमध्ये कूक्कू ही भूमिका साकारत कुब्राने लोकप्रियता मिळवली होती. आर्यनच्या अटकेवर ती म्हणाली, “तुमची प्रत्येक गोष्ट जेव्हा कुणीतरी जज करत असतं तेव्हा आयुष्य जगण्याची ती सर्वात कठीण आणि भयंकर वेळ असते. प्रत्येकजण जराही विचार न करता तसचं सत्याची पडताळणी न करता आपला निर्णय सांगत असतो.”

आर्यन खानच्या अटकेवरुन जावेद अख्तर यांचं मोठं विधान, म्हणाले “बॉलिवूड इंडस्ट्री…”

इंडिया टुडेला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “लोकांसाठी सत्य बदलले जाऊ शकत नाही. खास करुन जेव्हा ते तथ्यांमध्ये फेरफार करू लागतात. किंवा केवळ मनोरंजनासाठी सत्य बाजूला ठेवून अफवा पसरवू लागतात. हे आजच नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून घडत आलंय आणि हे खूपच दूर्दैवी आहे.” असं ती म्हणाली. आर्यन खान हा एका सुपरस्टारचा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जात आहे असं वाटतं का? या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली, “त्यांचीही कुटुंबं आहेत आणि त्यांची स्वतःची प्रतिष्ठा आहे, स्वतःचं जीवन आहे. आपल्याकडे असलेल्या माध्यमांचा वापर जबाबदारीने करा. फालतू आणि मूर्खपणा करू नका हा कुणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे.” असं ती म्हणाली.

यावेळी जुने दिवस बरे होते जेव्हा फक्त रात्री नऊ वाजता टीव्ही सुरु केल्यानंतर बातम्या लागायच्या ज्यात फक्त बातम्या असायच्या कुणाची मतं नव्हे असं ती म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुब्रा सोशल मीडियापासून दूर राहणचं पसंत करते. काही दिवसांपूर्वीच तिने ट्विटरचा निरोप घेतला होता. मात्र आता ती केवळ तिच्या संस्थेची माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करते. तसचं आता बातम्या पाहणं देखील तिने बंद केल्याचं ती या मुलाखतीत म्हणाली.