स्टँड अप कॉमेडीयन कुणाल कामरा याचे गुरूग्राम, हरियाणातील शो रद्द करण्यात आले आहेत. १७ आणि १८ सप्टेंबरला कुणाल कामराचे हे शो होणार होते. मात्र, हा शो रद्द करावा, अन्यथा बंद पाडण्यात येईल, अशी धमकी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदने दिली होती. त्यानंतर हा शो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने पोलिसांनी एक निवेदन दिले होते. त्यामध्ये म्हटलं की, कुणाल कामरा हा हिंदू देवी, देवतांचा अपमान करतो. या शोमुळे गुरूग्रामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. हा शो तात्काळ रद्द करण्यात यावा. अन्यथा शो बंद पाडण्यात येईल, असा इशारा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने दिला होता.

त्यानंतर कुणालने विश्व हिंदू परिषदेला उद्देशून पत्रदेखील लिहिलं. त्यावरून चांगलाच गहजब झाला. आता त्याने अभिनेत्री कंगना रणौतवर निशाणा साधला आहे. नुकतंच कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर आणि त्यातील कलाकारांवर टीका केली होती. त्याबाबत कुणालने ट्विट केलं आहे.

कुणालने त्याच्या ट्वीटमध्ये म्हंटलं की, “कंगनाला वाटतं की इडी, एनआयए, सीबीआय यांच्याप्रमाणेच धर्मा प्रोडक्शनही केंद्र सरकारच्या अधीन आहे.” कुणालच्या या ट्वीटवरून सोशल मीडियावर पुन्हा त्याला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. “बरं झालं तुझा शो रद्द झाला” असंही लोकं ट्वीट करून म्हणत आहेत. एकूणच कुणालच्या आधीच्या पत्रामुळे आणि आता या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

कंगनाने ‘ब्रह्मास्त्र’च्या मेकर्सवर टीका करत चित्रपटाच्या कमाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जर खरे आकडे बाहेर आले तर हा चित्रपट हीट म्हणवला जाणार नाही असा कंगनाचा दावा आहे. करण जोहरने खरे आकडे लोकांसमोर आणावेत अशी मागणी कंगनाने केली आहे. इतकंच नाही तर ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जीला हुशार म्हणणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे असंही वक्तव्य कंगनाने केलं आहे.

आणखी वाचा : “मला ब्रह्मास्त्र पुन्हा बघायचाय कारण…” हृतिक रोशनची चित्रपटावर पहिली प्रतिक्रिया, ट्वीट होतंय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंगना सध्या ‘इमर्जन्सि’ या चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आहे. यामध्ये ती श्रीमती इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार असून ती स्वतः या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. याबरोबरच आगामी ‘तेजस’ आणि ‘सीता : द इंकार्नेशन’ या चित्रपटातही कंगना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.