काही दिवसांपूर्वी ‘पांडू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि सोनाली कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चित्रपटगृहांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. आता हा चित्रपट प्रेक्षकांना टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहते फार आनंदी असल्याचे दिसत आहे.

भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या धमाल जोडीचा अफलातून अभिनय, सोबतीला सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळीसारख्या गुणी अभिनेत्रींच्या कसदार भूमिका, प्रविण तरडे आणि आनंद इंगळेसारखे कसलेले सहकलाकार, थिरकायला लावणारं संगीत आणि विजू माने यांचं कौशल्यपूर्ण दिग्दर्शन, या सगळ्या दिग्गजांच्या योगदानामुळे रंगलेली ‘पांडू’सारखी दर्जेदार कलाकृती येत्या रविवारी संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर प्रथमच पाहायला मिळणार आहे.

याबद्दल बोलताना भाऊ कदम म्हणाला, ‘सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत प्रेक्षकांना मनोरंजनाचे दोन क्षण देणे आणि त्यांचा ताण हलका करणे यासारखं दुसरं पुण्य नाही. ‘पांडू’ हा सिनेमा प्रेक्षकांची ही गरज १०० टक्के पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत टेन्शनफ्री होऊन रविवारी या चित्रपटाचा आस्वाद घ्यावा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पांडू चित्रपट झी मराठीवर प्रसारित होणार याबद्दल कुशल बद्रिके म्हणाला, “मी या चित्रपटात महादू हवालदाराची भूमिका साकारतोय. मी आणि भाऊ, आम्ही आजवर विविध माध्यमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. हीच परंपरा या चित्रपटाने कायम ठेवली आहे. गेल्या २१ वर्षांत आमच्यातली मैत्री खूप घट्ट विणली गेलीय आणि हीच मैत्री पांडू आणि महादूच्या निमित्तानं प्रेक्षकांना आता छोट्या पडद्यावर घर बसल्या अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नुसतं हसवणारच नाही तर एक नवी ऊर्जाही देईल हा विश्वास मला आणि आमच्या संपूर्ण टीमला आहे.”