करोनाच संकट पुन्हा एकदा आपल्या समोर उभ राहिलं आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींजवर देखील होतं आहे. अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यातच आता ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत शीतलची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी बावकरला करोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. शिवानीने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे.

शिवानीने ट्वीट करतं ही माहिती दिली. ‘नमस्कार मित्रांनो! सर्व काळजी घेऊनही, दुर्देवाने माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी घरातच आयसोलेशनमध्ये आहे. माझ्या डॉक्टरांनी दिलेले सर्व प्रोटोकॉल फॉलो करत, डॉक्टरांनी सांगितल्यानुसार औषधोपचार करीत आहे. मी सर्वांना विनंती करते की आवश्यक खबरदारी घ्या आणि आवश्यक असल्यासच घराच्या बाहेर पडा. सुरक्षित रहा आणि निरोगी रहा. भेटू लवकरचं!,’ असे ट्वीट करत शिवानीने करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

शिवानी ही ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील शीतलीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. मालिकेतील शीतलीचा अंदाच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी शीतली आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. कलाविश्वाप्रमाणे शिवानी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रुग्णाची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. राज्यात १ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली असली, तरी करोनाच्या रुग्णवाढीला अद्यापही अंकुश लागलेला नाही. दिवसागणिक रुग्णसंख्येत मोठी वाढच होत आहे. करोनाचा प्रसार कमी होण्यासाठी कडक निर्बंध लागु करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही प्रवास करता येणार नाही आहे.