लावणी नृत्यांगना गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गौतमीचा चाहतावर्ग मोठा आहे. अनके समारंभांना गौतमीचे लावणी कार्यक्रम आयोजित केले जातात. गौतमीच्या कार्यक्रमांना तुफान गर्दीही झालेली पाहायला मिळते. तर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली गौतमी चित्रपटामध्ये कधी झळकणार याचं उत्तर तिने दिलं आहे.

गौतम पाटील तिच्या नृत्याबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अनेकदा तिच्या नृत्य सादरीकरणामुळे तिच्यावर टीका केली जाते, तर याबरोबरच आतापर्यंत यामुळे अनेक वादही निर्माण झाले आहेत. पण तिची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.

आणखी वाचा : “तू लग्न कधी करणार?” अखेर गौतमी पाटीलने दिलं उत्तर, नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा सांगताना म्हणाली…

गौतमीने नुकतीच ‘एबीपी माझा’च्या माझा कट्ट्यावर हजेरी लावली. त्यावेळी गौतमीने तिचे भविष्यातील प्लॅन्स सांगितले. ती म्हणाली, “भविष्यात मला काय करायचं आहे याचा विचार मी कधीही करत नाही. मला जशी कार्यक्रमांची ऑफर येते, जशी गाण्यांची ऑफर येते तशी मी ती स्वीकारत जाते. पण जर मला कधी चित्रपटाचे विचारणा झाली तर मी ती नक्कीच स्वीकारेन.”

हेही वाचा : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पोलिसांनी संमती नाकारली, ‘हे’ आहे कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील लवकरच एका चित्रपटात जुळणार असल्याची बातमी समोर आली होती. ‘घुंगरू’ असं तिच्या या आगामी चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटातून कलाकार आणि लोककलावंत यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची गौतमीचे चाहते वाट बघत आहेत.