अभिनेत्री कंगना रणौतचा शो लॉक अप मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहे. प्रत्येक आठवड्यात स्वतःला शोमधून बाहेर जाण्यापासून वाचवण्यासाठी सदस्य वेगवेगळे खुलासे करताना दिसतात. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसते. आताही एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं अभिनय क्षेत्रात आल्यानंतर वशीकरण आणि काळी जादू अशा गोष्टी केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. सध्या ही अभिनेत्री सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

‘लॉक अप’शो मागच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आला आहे. पण आता नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये या शोची सदस्य आणि प्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगीनं स्वतःबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. पायल म्हणाली, ‘मी अभिनय क्षेत्रात आल्यानंतर करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी वशीकरणाची मदत घेतली होती.’

आणखी वाचा- Oscar 2022 मध्ये Dune चा सिक्सर! १० नामांकनापैकी ‘या’ ६ महत्त्वाच्या पुरस्कारांवर कोरलं नाव

पायल पुढे म्हणाली, ‘दिल्लीमध्ये मला एका व्यक्तीनं सांगितलं होतं की तू ज्याच्याबद्दल विचार करते त्याची कोणतीही वस्तू मला आणून दे मी गंगा तटावर पूजा करेन आणि जेव्हा मी हे करेन तेव्हा तू त्या व्यक्तीबद्दल विचार कर.’ दरम्यान यावर पायलनं स्पष्टीकरण दिलं की यातल्या कोणत्याच गोष्टीचा तिला फायदा झाला नाही. मात्र हे कोणाला सांगितल्यावर लोक खिल्ली उडवतील याची तिला भीती असल्याचं तिनं म्हटलं.

आणखी वाचा- ऐतिहासिक! ‘हा’ कलाकार ठरला सहाय्यक भूमिकेसाठी ऑस्कर जिंकणारा पहिला कर्णबधिर अभिनेता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर कंगना तिला म्हणाली, ‘पायल तुला माहिती आहे का तू जे केलं आहे त्याला काळी जादू म्हणतात. तू काळी जादू करून लोकांकडे काम मागण्याचा प्रयत्न केला होतास का? तू एवढी सुंदर आहेस. टॅलेंटेड आहेस. तुझ्या कामातूनच तू लोकांना आकर्षित करू शकतेस. तुला कोणत्याची मांत्रिकाची गरज नाही. या अशा गोष्टींच्या नंतर खूप चर्चा होतात.’