Entertainment News Updates : आजकाल अनेक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत; तर काही चित्रपट सरासरीपेक्षा कमी कमाई करत आहेत.
राजकुमार रावचा ‘मालिक’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन चार दिवस झाले आहेत आणि आतापर्यंत त्याने फक्त १५ कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे.
‘मालिक’ने पहिल्या सोमवारी म्हणजेच रिलीजनंतर चौथ्या दिवशी फक्त १.६५ कोटी रुपये कमावले आहेत. त्यानंतर, त्याचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन १५.९० कोटी रुपये झाले आहे.
‘मालिक’ या चित्रपटात मानुषी छिल्लरदेखील आहे, जी राजकुमार रावच्या व्यक्तिरेखेच्या पत्नीची भूमिका साकारते. या चित्रपटात प्रोसेनजीत चॅटर्जीदेखील आहेत. त्यांचा अभिनयही चांगला आहे. ते बंगाली चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. हा चित्रपट पुलकितने दिग्दर्शित केला आहे.
याबरोबरच, मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…
Manoranjan News Updates: आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या...
"मी पाण्याशी बोलते…", अंकिता लोखंडेच्या सौंदर्याचे रहस्य आहे 'मॅजिक वॉटर'; म्हणाली, "चांदीच्या ग्लासमध्ये…"
जॉन अब्राहमच्या लग्नाला १३ वर्ष होऊनही मूलबाळ नाही; म्हणाला, "आई-बाबा न होण्याचा निर्णय…"
रणवीर सिंहच्या 'डॉन ३' मधून विक्रांत मॅसी बाहेर; 'हा' दाक्षिणात्य अभिनेता साकारू शकतो खलनायकाची भूमिका
रणवीर सिंहच्या बहुप्रतिक्षित 'डॉन ३' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात अभिनेता विक्रांत मॅसीशी सामना करणार होता, जो चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार होता. पण आता बातमी अशी आहे की विक्रांतने 'डॉन ३' चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत, आता चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी दोन कलाकारांची नावे पुढे येत आहेत. त्यापैकी एक दक्षिण चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे.
असे म्हटले जात आहे की निर्मात्यांनी या भूमिकेसाठी दोन कलाकारांशी संपर्क साधला आहे. यामध्ये आदित्य रॉय कपूर आणि दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाचा यांचा समावेश आहे. अद्याप दोघांपैकी कोणीही यासाठी सहमत झालेले नाही.
"सखीला खूप वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं", अभिनेता सुव्रत जोशी म्हणाला, "समाजात काही पुरुष असे असतात…"
"हा राजकीय मुद्दा नाही तर…", मराठी-हिंदी वादावर प्रसिद्ध दिग्दर्शकांनी व्यक्त केलं मत; म्हणाले…
५५ वर्षांच्या आर माधवनचा चेहरा एवढा तरुण कसा? त्यानेच सांगितलंय त्यामागचं सिक्रेट; म्हणाला, "महागड्या क्रीम किंवा कॉस्मेटिक…"
"प्रत्येकामध्ये एक जोकर…", अभिनेते अविनाश नारकर ट्रोलिंगबाबत म्हणाले, "मला स्वत:ला वेडवाकडं नाचावं…"
क्रिती सेनॉनने लॉर्ड्सवर कथित बॉयफ्रेंडबरोबर पाहिली मॅच; फोटो व्हायरल
अलिकडेच लॉर्ड्स स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील एक कसोटी सामना पार पडला. लॉर्ड्सवर भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली.
अक्षय कुमराही पत्नीबरोबर पोहोचला होता. तर क्रिती सेनॉनही कथित बॉयफ्रेंड कबीर बहियाबरोबर मॅच बघायला आली होती. कबीरनेच क्रितीबरोबरचा स्टेडियमवरील सेल्फी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. क्रितीला जवळ घेऊन मागे स्टेडियमचा नजारा दाखवत त्याने फोटो काढला आहे. दोघंही यामध्ये एकदम स्टायलिश लूकमध्ये दिसत आहेत.
"ती पावसात गजरा विकत होती अन्…", अमिताभ बच्चन यांनी सांगितला 'तो' किस्सा; म्हणाले, "माझ्या खिशात…"
रणबीर कपूर आणि अजय देवगणबरोबर काम केलेल्या अभिनेत्याचा होता ऑम्लेटचा स्टॉल; म्हणाला, "मुंबईत काही लोक…"
पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर काम केल्याबद्दल अनुपम खेर यांची दिलजीत दोसांझवर टीका, म्हणाले, "कलेच्या नावाखाली…"
'जारण'च्या यशानंतर अमृता सुभाष 'या' सिनेमात झळकणार! पोस्टर आलं समोर, सोबतीला असेल 'ही' लोकप्रिय अभिनेत्री…
“श्रीदेवींनी कोणालाही स्वत:च्या…", ज्येष्ठ अभिनेत्याचं वक्तव्य; म्हणाले, “अमिताभ बच्चन…”
प्रसिद्ध धार्मिक मालिका निर्माता-दिग्दर्शक धीरज कुमार यांचं निधन झालं असून त्यांच्यावर कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना न्यूमोनिया झाल्यामुळे प्रकृती चिंताजनक होती आणि शनिवारी रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांनी ‘ओम नमः शिवाय’, ‘श्री गणेश’ यांसारख्या लोकप्रिय धार्मिक मालिकांसह क्रिएटिव्ह आय कंपनीच्या माध्यमातून अनेक निर्मिती केली.
धीरज कुमार यांची प्रकृती बिघडल्यामुळे शनिवारी त्यांना रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना न्यूमोनिया झाल्याचे सांगण्यात येत आहे. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
"मी दिवसाला ४० रोट्या खात होतो आणि दीड लिटर दूध प्यायचो", प्रसिद्ध अभिनेता त्याच्या डाएटबद्दल म्हणाला, "माझे वजन…"
नाना पाटेकरांच्या 'नटसम्राट' सिनेमाबद्दल भरभरुन बोलला 'हा' बॉलीवूड अभिनेता; म्हणाला, "तो चित्रपट..."
"…आम्ही वेगळे झालो", ज्येष्ठ अभिनेत्याचा मुलीबरोबर होता ३ वर्षे अबोला; स्वत:च केला खुलासा, म्हणाले…
"गरीबांचे स्टॉल बंद पाडू नका", मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट; म्हणाली, "हिंमत असेल तर…"
"४ वर्षांचं रिलेशनशिप…", 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' फेम अभिनेत्याने गर्लफ्रेंडला केले प्रपोज; काय करते अभिनेत्याची गर्लफ्रेंड? घ्या जाणून..
"रस्त्यावरचा गुंड…", शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितला 'तो' किस्सा; पुनम सिन्हा यांच्या आईने लग्नासाठी दिलेला नकार; संसाराला ४५ वर्षे झाल्यानंतर म्हणाले…
परवीन बाबी यांना का सोडायचे होते बॉलीवूड? कबीर बेदी यांनी केला खुलासा; म्हणाले, "मी तिच्यावर…"
प्रसिद्ध रॅपर राहुल फाजिलपुरियावर अंदाधुंद गोळीबार; प्रकृतीबाबत ही माहिती आली समोर
गुरुग्राममध्ये हरयाणवी गायक आणि रॅपर राहुल फाजिलपुरिया याच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. गुरुग्रामच्या सेक्टर 71 मध्ये गायक त्याच्या फॉर्च्युनर कारमधून सोसायटीतून बाहेर पडत असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणारे टाटा हॅरियर कारमधून आले आणि राहुल फाजिलपुरिया याच्या गाडीवर दोन राऊंड अंदाधूंद गोळीबार करून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. रॅपर राहुल फाजिलपुरिया याच्या गाडीवर झालेल्या गोळीबारात राहुल फाजिलपुरिया थोडक्यात बचावला. सुदैवाची बाब म्हणजे, सध्या कोणीही जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
अखेर 'पारू'चं प्रेम जिंकणार! आदित्यने घेतला मोठा निर्णय, मालिकेत येणार 'असा' ट्विस्ट; प्रोमो आला समोर…
'बिग बॉस १९' मध्ये दिसणार धनश्री वर्मा?
सलमान खानचा रिअॅलिटी शो 'बिग बॉस' पुन्हा एकदा चर्चेत आहे, कारण त्याचा १९ वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. शोचे निर्माते सतत नवीन स्पर्धकांसाठी बैठका घेत आहेत आणि वेगवेगळ्या नावांवर विचार केला जात आहे.
युजवेंद्र चहलची एक्स पत्नी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर धनश्री वर्मा हिच्याबद्दल बातम्या येत आहेत की ती सलमान खानच्या 'बिग बॉस १९' शोमध्ये दिसणार आहे. इंडिया टुडेच्या इन्स्टाग्राम पोस्टनुसार, धनश्रीला 'बिग बॉस'च्या नवीन सीझनसाठी संपर्क साधण्यात आला आहे. शोमधील सूत्रांचे म्हणणे आहे की ती शोसाठी जवळजवळ फायनल झाली आहे. याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
राजकुमार राव (फोटो : लोकसत्ता)
आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…