भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाकरिता बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडाकरला महाराष्ट्र शासनातर्फे राज कपूर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
१२ ऑगस्टला होणा-या पुरस्कार सोहळ्यात मधुर भांडारकरला हा पुरस्कार देण्यात येईल. मला अभिनंदनाचे संदेश पाठवणा-या सर्वांचा मी आभारी आहे. महाराष्ट्र शासनाने देऊ केलेल्या या सन्मानाचा मी नम्रपणे स्वीकार करतो, असे भांडारकरने ट्विट केले आहे. भांडारकरला त्याच्या ‘चांदनी बार’,’ पेज ३’,’ फॅशन’, ‘ट्रॅफिक सिग्नल’ चित्रपटांकरिता राष्ट्रीय पुरस्कार यापूर्वी मिळाला आहे. विशेष कॅलेंडरवर झळकणा-या मॉडेल्सच्या आयुष्यावर आधारित ‘कॅलेंडर गर्ल्स’ या चित्रपटाच्या कामात सध्या तो व्यस्त आहे.
अभिनेत्री तनुजा आणि मराठी अभिनेत्री उमा भेंडे यांना राज कपूर स्मृती पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Aug 2014 रोजी प्रकाशित
मधुर भांडाकरला राज कपूर स्मृती पुरस्कार
भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाकरिता बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडाकरला महाराष्ट्र शासनातर्फे राज कपूर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

First published on: 05-08-2014 at 05:48 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्र सरकारMaharashtra Government
+ 3 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhur bhandarkar to receive raj kapoor smriti awards