Madhuri dixit praise gashmeer mahajani by saying you are sultaan rnv 99 | "तू तुझ्या आयुष्याचा सुलतान..." माधुरी दीक्षितने केले गश्मीर महाजनीची कौतुक | Loksatta

“तू तुझ्या आयुष्याचा सुलतान…” माधुरी दीक्षितने केले गश्मीर महाजनीचे कौतुक

गशमीरने ‘सुलतान’ गाण्यावर नृत्य करत त्याच्या आयुष्यात केलेला संघर्ष दाखवला आहे.

gashmeer

मराठी चित्रपटसृष्टीतील हॅंडसम हंक अशी ओळख असलेला अभिनेता गश्मीर महाजनी सध्या चर्चेत आहे. गश्मीरने आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा गश्मीर हा उत्कृष्ट नर्तकही आहे. सध्या ‘झलक दिखला जा’च्या १०व्या सीझनमध्ये गश्मीर महाजनी स्पर्धक म्हणून सहभागी झालेला पाहायला मिळत आहे. त्याच्या नृत्याचे प्रेक्षकांकडून ‌कौतुक नेहमीच होत आले आहे. पण आता माधुरी दीक्षितकडूनही गश्मीरला कौतुकाची थाप मिळाली आहे.

आणखी वाचा : ‘आरआरआर’ चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत पुढे, ‘या’ दोन विभागांत नामांकन मिळण्याची शक्यता

सोशल मीडियावर गश्मीरचा या कार्यक्रमातला एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. त्यात गशमीरने ‘सुलतान’ गाण्यावर नृत्य करत त्याच्या आयुष्यात केलेला संघर्ष दाखवला आहे. अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीरसाठी अभिनयातील करिअरची वाट निवडणे सोपे नव्हते. गश्मीरने आयुष्यात खूप लहान वयात आर्थिक अडचणी अनुभवल्या आणि त्यामुळेच अभिनय ही त्याची आवड नव्हे तर गरज झाली.

अभिनयासोबत एक जोड व्यवसाय असावा म्हणून रवींद्र महाजनी यांनी बांधकाम व्यवसायात भागीदारी केली आणि तिथे त्यांची फसवणूक झाली. त्यांचं पुण्यातील राहतं घरं जप्त करण्यात आलं. त्यांच्यावर असलेल्या कर्जाचा डोंगरही वाढला. गश्मीरच्या आईवर जेमतेम पगाराची नोकरी करण्याची वेळ आली. तेव्हा गश्मीर फक्त पंधरा वर्षाचा होता. त्यामुळे आवड म्हणून जपलेल्या नृत्याला व्यवसाय बनवण्याचा निर्णय गश्मीरने घेतला आणि त्याने अकरावीत असतानाच नृत्याचे धडे द्यायला सुरूवात केली. तसेच नाटकांमध्ये मिळेल ती भूमिका करून आर्थिक गरज भागवली. गश्मीर महाजनी वयाच्या १५ व्या वर्षापासून डान्स अकादमी चालवत आहेत. कौटुंबिक परिस्थिती सावरण्यासाठी गश्मीरने सुरू केलेल्या या अकादमीने त्याला सुखाचे दिवस दाखवले.

हा संपूर्ण संघर्ष त्याने नृत्याच्या माध्यमातून उलगडला. तो पाहताना तिथे उपस्थित असलेल्या त्याच्या आईच्या डोळ्यातूनही पाणी आलं. नंतर स्टेजवर येऊन आई म्हणाली, “हा नसता तर आम्ही नसतो.” त्यानंतर माधुरी दीक्षितनेही त्याचं खूप कौतुक केलं. ती म्हणाली, “गश्मीर, तू तुझ्या आयुष्याचा सुलतान आहेस.”

हेही वाचा : “मला तुझा खूप अभिमान आहे,” माधुरी दीक्षितने केले अमृता खानविलकरचे कौतुक

गश्मीरने त्याच्या आयुष्यात केलेला संघर्ष पाहिल्यावर फक्त त्याच्या आईच्याच नाही तर तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. तर प्रेक्षकांना त्याचा वाटणारा अभिमान दुपटीने वाढला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून या व्हिडीओवर कमेंट्स करत नेटकरी गश्मीरचे खूप कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-09-2022 at 10:13 IST
Next Story
“मी ठरविले आहे, यापूढे मी कोणत्याही कलाकृतीत…” अभिनेते पंजक त्रिपाठी यांनी घेतला मोठा निर्णय