सध्या सोशल मीडियावर कच्चा बादाम हे गाणं प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीचं ‘कच्चा बादाम’ हे गाणं झालं होतं. खरतरं हे गाणं पश्चिम बंगालमधील शेंगदाणा विक्रेता भुबन बड्याकरने गायलं आहे. त्यानंतर त्या गाण्यावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. पण यावेळी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि अभिनेता रितेश देशमुखचा या गाण्यावर डान्स करताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ माधुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ द फेम गेम या चित्रपटाच्या सेटवरचा आहे. इथे रितेश आणि माधुरी डान्स करताना दिसत आहेत.

आणखी वाचा : १ एप्रिल पासून या ५ राशीचे बदलणार भाग्य, मिळणार लक्ष्मी मातेचा आशीर्वाद

आणखी वाचा : या चित्रात तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसले? यावरून जाणून घ्या तुमचे व्यक्तीमत्त्व

दरम्यान, माधुरी दीक्षितने ओटीटीवर पदार्पण केले आहे. द फेम गेम या चित्रपटातून माधुरीने ओटीटीवर वक्तव्य केले आहे. या एका कलाकाराचे सगळ्यांसमोर असलेले आयुष्य आणि खरे आयुष्य कसे असते ते दाखवले आहे.

आणखी वाचा : या ४ राशीच्या लोकांनी सोनं परिधान केले तर येईल ‘राजयोग’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या भुबन बड्याकरने खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी ‘कच्चा बदाम’ हे गाणं तयार केलं होतं. पण त्याच्या या गाण्यावर आज सगळ्यांना नाचायला भाग पडेल याची कल्पना नव्हती. भुबन बड्याकरचे गाणे नंतर रिमिक्स केले गेले आणि YouTube वर अपलोड केले गेले. यावर या गाण्याला आतापर्यंत १०९ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाली आहेत.