सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने काही काळासाठी विश्रांती घेतली होती. आता पुन्हा एकदा या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरु झालं आहे. या कार्यक्रमामधील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. या कलाकारांमधील असाच एक कलाकार म्हणजे गौरव मोरे. गौरव अगदी सामान्य कुटुंबातील मुलगा. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आणि याबाबत त्याने लोकसत्ता ऑनलाईनशी संवाद साधला.

आणखी वाचा – चाळीमध्ये पहिलं प्रेम मिळालं का? अंकुश चौधरी म्हणाला, “अपघातात तिचं निधन झालं अन्…”

फिल्टर पाड्याचा बच्चन अशी गौरव मोरेची ओळख. गौरव अजूनही पवई येथील फिल्टर पाड्यामध्ये राहतो. आपण जिथे राहतो त्या भागाचा गौरवला अभिमान आहे. याबाबतच बोलताना गौरव म्हणाला, “माझं बालपण आणि आतापर्यंतच संपूर्ण आयुष्यत फिल्टर पाड्यामध्ये गेलं आहे. हिच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मुंबई हे माझं जगातलं आवडतं शहर आहे. माझं संपूर्ण कुटुंबच फिल्टर पाडा येथील घरात राहतं.”

पाहा व्हिडीओ

“माझ्याच काही मित्रांचा अनुभव मी सांगतो. माझे मित्र शिकले, आर्थिकदृष्ट्या स्थिर झाले. पण हेच मित्र जेव्हा बोलतात फिल्टर पाड्यामध्ये राहायला नको हे ऐकून मला फार वाईट वाटतं. ज्या जागेने आपल्याला आसरा दिला त्याच जागेबाबत अशा पद्धतीने कोणतरी बोलतं ते मला खटकलं. आपणच जर आपण राहत असलेल्या भागाबाबत असं बोलत राहिलो तर येणारी पिढी काय लक्षात ठेवणार?”

आणखी वाचा – Video : बिपाशा बासू गरोदर पण ट्रोल होतोय नवरा, करण ग्रोवरचं वागणं पाहून नेटकऱ्यांना राग अनावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे गौरव म्हणाला, “मी अजूनही तिथेच राहतो कारण फिल्टर पाड्याबाबत मला प्रेम आहे. आजही मी घरात असलो की लोक येऊन माझ्या घराचे फोटो काढतात. मला अभिमान आहे की मी फिल्टर पाड्याचा आहे.” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे गौरव नावारुपाला आला. प्रसिद्धी मिळाली तरी त्याच्यामधील साधेपणा अजूनही कायम आहे.