विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चंद्रमुखी या चित्रपटातील गाणी, पोस्टर, ट्रेलर, टिझर सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील चंद्रा या लावणीवर अनेकजण नाचताना दिसत आहे. त्याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकतंच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील लाडक्या परीलाही ‘चंद्रा’ या गाण्याने भुरळ घातली आहे. तिने याबाबतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि मायरा वायकुळ ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेत परी ही भूमिका साकारणाऱ्या मायरा वायकुळने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मालिकेतील छोट्या मायराचा अभिनय पाहण्यासारखा आहे. नुकतंच परीने या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातील एका गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ चित्रपटावर प्रियांका चोप्राची प्रतिक्रिया, म्हणाली…

परी म्हणजे मायरा वायकुळने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. यात ती हुबेहुब अभिनेत्री अमृता खानविलकरप्रमाणे नाचताना दिसत आहे. विशेष म्हणजे मायराने अगदी अमृताप्रमाणेच साडी नेसली आहे. तसेच हा डान्स करताना तिच्या चेहऱ्यावरील हावभावही फार बोलके असल्याचे दिसत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना तिने ‘चंद्रा’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओवर अमृता खानविलकरनेही कमेंट केली आहे. ‘माझी गोंडस… माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे मायरा’, असे कमेंट तिने केली आहे. त्यावर मायराने ‘धन्यवाद…’ अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

प्रियांका चोप्राने दाखवली वॉडरोबची खास झलक, हिल्स आणि शूजचे कलेक्शन पाहून चाहतेही आवाक्

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. दरम्यान ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट उद्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.