बॉलिवूडमधील स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक असलेली मलायका अरोरा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मलायका अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी फॅशन आणि फिटनेसच्या बाबतीत खूपच जागरुक आहे. मलायका आघाडीच्या तरुण अभिनेत्रींनाही फिटनेसच्या बाबतीत टक्कर देते. मलायका नेहमीच सोशल मीडियावर फिटनेस व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. इन्स्टाग्रामवर तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. आता मलायका एक फिटनेस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी मलायका अरोरा तिच्या वर्कआउटचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती योगा प्रशिक्षकासोबत योग करताना दिसत आहे. तिचा व्हिडीओ पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. मलायका या व्हिडीओमध्ये आपलं शरीर स्ट्रेच करताना दिसत आहे. ४८ वर्षीय मलायकाच्या शरीराची लवचिकता तरुण अभिनेत्रींनाही लाजवणारी आहे.

मलायकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. मलायकाचे चाहते तिच्या या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. अनेकांनी मलायकाला आपली प्रेरणा म्हटलं आहे. एका युजरनं मलायकाच्या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, “विश्वास बसत नाही की मलायकाचं वय ४५ वर्षांपेक्षा जास्त आहे.” तर दुसऱ्या एका युजरनं मलायकाच्या फिटनेसला सॅल्यूट केला आहे.

आणखी वाचा- Video : मलायका अरोराचा ट्रान्सपरंट ड्रेस, रॅम्प वॉक अन्…; अभिनेत्रीच्या एण्ट्रीने उपस्थितही भारावले, व्हिडीओ चर्चेत 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत एका पार्टीमध्ये स्पॉट झाली होती. यावेळी ती पर्पल कलरच्या बॅकलेस ड्रेमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. तिचा हा लुक सोशल मीडियावर बराच चर्चेत राहिला होता. मलायकाने परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत तब्बल १ लाख १९ हजार ७७६ रुपये एवढी होती.