गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरु आहे. रणबीर कपूर-आलिया भट्ट, कतरिना कैफ-विकी कौशल यांच्यानंतर आता लवकरच अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. बॉलिवूडमध्ये सध्याचे सर्वांचे लाडके कपल म्हणून ते कायमच चर्चेत असतात. ते अनेकदा बाहेर एकत्र फिरताना, पार्टीला जाताना दिसतात. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ते दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. नुकतंच मलायकाने तिच्या आणि अर्जुनच्या लग्नाबद्दलचा खुलासा केला आहे.

मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका चित्रपटसृष्टीत सक्रीय नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या मलायका ही बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान ती आणि अर्जुन कपूरसोबत लग्नाचा विचार करत आहे. सध्या आम्ही दोघेही याचे नियोजन करत आहे, असे तिने म्हटले.

“माझा तिच्याशी काहीही संबंध नाही…”, सौंदर्यासोबत ब्रेकअप झाल्याचा विशाल निकमचा खुलासा

मलायका अरोराने नुकतंच ‘बॉम्बे टाइम्स’ला मुलाखत दिली. यावेळी तिला अर्जुन कपूरसोबत लग्न करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “आम्हाला भविष्यात एकत्र राहायचे आहे, ही गोष्ट आम्हाला माहिती आहे. आम्ही दोघेही आता कोणत्या टप्प्यावर आहोत आणि जिथून पुढे आम्हाला काय करायचे याची आम्हाला माहिती आहे. आम्ही या गोष्टींवर नेहमी चर्चा करतो. आमचे विचार आणि कल्पना यासारख्या असतात. त्यामुळेच आम्ही एकत्र असतो.”

“आम्ही दोघेही आता मॅच्युअर आहोत. पण तरीही काही क्षुल्लक गोष्टी बदलण्यासाठी आमच्यात वाव आहे. पण पुढे भविष्यात आम्ही एकत्र आलेलं मला नक्कीच आवडेल आणि ते नाते कुठपर्यंत असेल हे पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहेत. आम्ही दोघेही हसत, मजा मस्ती करत असलो तरीही आम्ही या नात्याबद्दल फार गंभीर आहोत.” असेही मलायका म्हणाली.

राणादा आणि पाठकबाईंच्या साखरपुड्यावर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, अक्षया देवधर म्हणाली…

“मी खूप आनंदी आणि सकारात्मक आहे. अर्जुन मला नेहमी आत्मविश्वास आणि आश्वासन देतो. पण मला असे वाटत नाही की एकाच वेळी गुप्त गोष्टींबद्दल बोलावे. मला तुझ्याबरोबर जगाचे आहे, असे मी नेहमी त्याला सांगते. मला बाकी काहीही माहिती नाही, पण तो माझे मन नक्कीच जाणतो”, असेही तिने म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा १९ वर्षांचा झाला, त्यानंतर ते दोघंही वेगळे झाले होते. १९९८ साली या दोघांनी लग्न केलं होतं आणि २०१७ साली त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर मलायका आणि अरबाज या दोघांनीही करिअरवर लक्ष केंद्रीत केलं आहे. सध्या मलायका ही बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. येत्या मे महिन्यात ते दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.