बॉलिवूडमध्ये सध्याचे सर्वांचे लाडके कपल म्हणून अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर ओळखले जातात. ते अनेकदा बाहेर एकत्र फिरताना, पार्टीला जाताना दिसतात. गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका एकत्र न दिसल्यामुळे त्या दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चांमुळे त्या दोघांच्या चाहत्यांनाही जबरदस्त धक्का बसला होता. पण या सर्व चर्चांवर अर्जुन कपूरपाठोपाठ मलायकानेही प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्जुन कपूर हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. नुकतंच त्याने मलायकासोबतच्या ब्रेकअपच्या अफवांवर मौन सोडत सर्वांना सडेतोड उत्तर दिले आहे. अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टाग्रामवर मलायकासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. अर्जुन कपूरने त्या दोघांचा एक मिरर सेल्फी पोस्ट केला आहे. या दोघांचा हा फोटो पाहून त्यांच्यात सर्व काही व्यवस्थित असल्याचे स्पष्ट होत आहे.

अर्जुनने या फोटोला हटके कॅप्शन दिले आहे. अफवांना जागा नाही. सुरक्षित रहा, आनंदी रहा, खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना खूप प्रेम…, असे कॅप्शन अर्जुनने दिले आहे. दरम्यान अर्जुनची ही पोस्ट पाहून अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अनेकांनी ही जोडी कायम टिकावी, यासाठी प्रार्थनाही केली आहे.

विशेष म्हणजे अर्जुन कपूरने हा फोटो शेअर केल्यानंतर त्यावर मलायका अरोरानेही कमेंट केली आहे. यावेळी कमेंट करताना तिने काहीही न लिहिता फक्त हार्ट इमोजी शेअर केला आहे.

‘…फालतू लोकांकडे दुर्लक्षच कर’, अभिनेता प्रसाद ओकने पत्नीला दिला खास सल्ला

अनेकदा मलायका ही अर्जुन कपूर आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत डिनरला जाताना दिसत असते. पण अर्जुन बहिण रियाकडे गेला असताना त्यांनी एकमेकांना भेटणे टाळले असल्याचे समोर आले आहे. ‘सतत डिनरसाठी, कॉफी पिण्यासाठी एकत्र फिरणाऱ्या मलायका आणि अर्जुन एकमेकांना भेटत नसल्याचे चर्चा समोर आल्या होत्या. तसेच अर्जुन आणि मलायका यांच्यामध्ये भांडणे झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे त्या दोघांचा ब्रेकअप झाल्याचे बातम्या व्हायरल झाल्या होत्या. मात्र नुकंतच यावर अर्जुन कपूरने स्पष्टीकरण दिले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaika arora reacts to arjun kapoor post as couple quashes break up rumours nrp
First published on: 13-01-2022 at 10:08 IST