‘मंजुम्मेल बॉईज’ या दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेता गणपती सध्या चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी तो त्याच्या अभिनयासाठी नाही, तर मद्यधुंद अवस्थेत गाडी वेगाने चालवल्यामुळे चर्चेत आला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. ‘केरळ कौमुदी’च्या अहवालानुसार, गणपती अंगलामळीहून कलमस्सेरीकडे जात असताना पोलिसांनी त्याला पकडले.

रविवारी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे आणि सिग्नलचे उल्लंघन करणे या संदर्भात गुन्हा नोंदवला. अंगलामळी आणि कलमस्सेरीदरम्यानच्या महामार्गावर गणपती वेगाने गाडी चालवत होता. पोलिसांनी त्याला अठानी आणि आलुवा येथे थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो गाडी चालवत पुढे निघून गेला. शेवटी पोलिसांनी त्याला कलमस्सेरी येथे त्याला अडवले. त्याची अल्कोहोल टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली. पोलिसांनी सांगितले की, गणपतीने वाहन चालवताना अनेकदा मार्गिका बदलल्या आणि अत्यंत वेगाने गाडी चालवली. अटक झाल्यानंतर काही तासांनी त्याला जामिनावर सोडण्यात आले.

हेही वाचा…“जगातील माझ्या सर्वात…”, सलमान खानच्या वडिलांसाठी लुलिया वंतूरची पोस्ट; म्हणाली, “त्यांनी मला…”

बालकलाकार ते आघाडीचा अभिनेता

गणपती हा एक प्रसिद्ध मल्याळम अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. सुरुवातीला त्याने ‘विनोदयात्रा’, ‘प्रांचीएट्टन ॲण्ड द सेंट’ आणि ‘चित्रसालभंगलुडे वेडू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

गणपतीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात संतोष सिवन यांच्या ‘आनंदाभद्रम’ या चित्रपटासाठी डबिंग करून केली. त्यानंतर त्याला सिवन यांच्या ‘बीफोर द रेन्स’मध्ये बालकलाकार म्हणून ओळख मिळाली. सथ्यान अंथिकाड दिग्दर्शित ‘विनोदयात्रा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याच खूप कौतुक झाले. त्याने हिंदी चित्रपट ‘द वेटिंग रूम’मध्ये काम करून, हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

हेही वाचा…८ वर्षांचं भांडण मिटलं! अखेर गोविंदा व भाचा कृष्णा अभिषेक दिसणार एकत्र; कॉमेडियन म्हणाला, “आता मी तुम्हाला…”

तो जीतू जोसेफ दिग्दर्शित ‘मिस्टर ॲण्ड मिसेस राऊडी’ या चित्रपटात झळकला होता. कोरोना काळात त्याने ‘ओण्णु चिरिकू’ हा लघुपट दिग्दर्शित केला आणि ‘इन्स्टाग्राम’ या वेब सीरिजमध्ये काम केले.

हेही वाचा…ऋषी कपूर यांच्या ‘या’ होत्या अखेरच्या दोन इच्छा, लेक रिद्धिमा कपूर-साहनीने केला खुलासा; म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणपतीने ‘जॅन.ई.मॅन’ या चित्रपटाचे सहलेखनही त्याने केले आणि यात भूमिका साकारली. हा चित्रपट त्याच्या भावाने म्हणजे चिदंबरम यांनी दिग्दर्शित केला होता. त्यानंतर तो चिदंबरमच्या ‘मंजुम्मेल बॉईज’मध्ये झळकला. २०२४ मध्ये ‘मंजुम्मेल बॉईज’ हा मल्याळम चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला.