Latest Entertainment News Today 25 May 2025: प्रिन्स धीमान दिग्दर्शित ‘केसरी वीर’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २३ मे २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सुनिल शेट्टी व सुरज पांचोली हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. २ दिवसांत या चित्रपटाने किती कमाई केली हे जाणून घेऊयात.

पहिल्या दिवशी या चित्रपटाने २५ लाख इतकी कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ३१ लाख इतकी कमाई केली आहे. दोन दिवसांत या चित्रपटाने ५६ लाख इतकी कमाई केली आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…

Live Updates

Manoranjan Breaking News Updates: आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या…

19:54 (IST) 25 May 2025

प्रीती झिंटाची कौतुकास्पद कामगिरी, सैनिकांच्या विधवा पत्नी आणि मुलांसाठी दिले 'इतके' कोटी; म्हणाली…

प्रीती झिंटाचा सैनिकांच्या विधवा पत्नी आणि मुलांसाठी मदतीचा हात; 'इतक्या' कोटींची दिली देणगी ...वाचा सविस्तर
19:54 (IST) 25 May 2025

'नवरी मिळे हिटलरला' फेम लीलाची ऑनस्क्रीन बहीण सेटवरील फोटो शेअर करत म्हणाली, "इथल्या लोकांनी…"

Navri Mile Hitlerla fame Actress Shares Emotional Post: 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट; म्हणाली… ...सविस्तर वाचा
18:55 (IST) 25 May 2025

"माझ्या बायकोवर…", जीवा नंदिनीचा पत्नी म्हणून स्वीकार करणार? 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले…

Lagnanantar Hoilach Prem: जीवाचे बोलणे ऐकल्यानंतर काव्या काय करणार? पाहा प्रोमो ...वाचा सविस्तर
18:27 (IST) 25 May 2025

रीमा लागूंनी घरच्यांच्या नकळत दिलेले साडेतीन लाख रुपये; शरद पोंक्षेंनी सांगितली आठवण, म्हणाले, "मी ते सगळे पैसे…"

संघर्ष काळात रीमा लागूंनी केलेली साडेतीन लाखांची मदत, शरद पोंक्षेंनी सांगितली जुनी आठवण, जाणून घ्या... ...वाचा सविस्तर
17:26 (IST) 25 May 2025

"जेव्हा आयुष्य कठीण असते…", संजय दत्तने वडील सुनील दत्त यांच्यासाठी शेअर केली भावनिक पोस्ट, म्हणाला, "तुम्ही मला फक्त…"

संजय दत्तने वडील सुनील दत्त यांच्यासाठी शेअर केली भावनिक पोस्ट ...सविस्तर बातमी
17:21 (IST) 25 May 2025

"स्वत:ला खूपच भाग्यवान समजते", आईच्या आठवणीत मृणाल कुलकर्णी भावुक, म्हणाल्या, "शेवटचा संस्कार…"

मृणाल कुलकर्णींनी शेअर केली आईबद्दलची 'ती' आठवण, म्हणाल्या, "शेवटचा संस्कार..." ...सविस्तर वाचा
17:01 (IST) 25 May 2025

"मी सिंगल आहे…", 'प्रेमाची गोष्ट' फेम अपूर्वा नेमळेकर लग्नसंस्थेबाबत म्हणाली, "माझा लग्नसंस्थेवर विश्वास…"

Apurva Nemlekar on Marriage Institution: "ज्या दिवशी याची जाणीव होईल…", लग्नाबाबत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर म्हणाली… ...वाचा सविस्तर
16:57 (IST) 25 May 2025

"त्यांचा मृत्यू होताना…", शम्मी कपूर यांच्याबरोबरची शेवटची भेट आठवत मुमताज म्हणाल्या, "त्यांच्या हातात एक…"

एक काळ असा होता जेव्हा मुमताज यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले होते. ...सविस्तर वाचा
16:09 (IST) 25 May 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्यावर भडकल्या रुपाली गांगुली, म्हणाल्या, "किती खालच्या थराला…"

दाक्षिणात्य अभिनेत्याने शेअर केलं नरेंद्र मोदींचं व्यंगचित्र, रुपाली गांगुलींना राग अनावर, म्हणाल्या, "किती खालच्या थराला..." ...सविस्तर बातमी
15:51 (IST) 25 May 2025

अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसह पोहोचली अयोध्येत; रामलल्ला आणि बजरंग बलीचे घेतले दर्शन, व्हिडीओ व्हायरल

अनुष्का शर्मा-विराट कोहलीचं अयोध्येतील हनुमान गढी मंदिरात दर्शन. ...सविस्तर बातमी
14:45 (IST) 25 May 2025

"रेखा मला पाहून वेडेवाकडे…", दिग्गज अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांचा दावा; म्हणाल्या, "विनोद मेहराच्या आयुष्यावर नियंत्रण…"

Moushumi Chatterjee Recalls Rivalry With Rekha: "रेखा सतत दुय्यम...", रेखा यांच्याबद्दल मौसमी चॅटर्जी काय म्हणाल्या? ...वाचा सविस्तर
14:06 (IST) 25 May 2025
सलमान खानचा सिंकदर चित्रपट 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार; बॉलीवूडचा भाईजानने शेअर केला व्हिडीओ

बॉलीवूडच्या भाईजानचा 'सिंकदर' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आता हा चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

विशेष म्हणजे, 'सिंकदर' चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करणारा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/reel/DKEJtZ9oIT_/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

13:58 (IST) 25 May 2025

मुमताज यांच्याबरोबर जितेंद्र यांनी 'या' चित्रपटात काम करण्यास दिला होता नकार, अभिनेत्री म्हणाल्या, "माफ करा जीतू…"

मुमताज यांनी चित्रपटसृष्टीत आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. ...सविस्तर बातमी
12:55 (IST) 25 May 2025

'नवरी मिळे हिटलरला' फेम प्रसाद लिमयेचे अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्याबाबत वक्तव्य; म्हणाला, "त्या काळत तिने मला…"

Prasad Limaye Talks About Harshada Khanvilkar: "माझी आई नाहीये, पण...", मराठी अभिनेता प्रसाद लिमये काय म्हणाला? ...वाचा सविस्तर
12:55 (IST) 25 May 2025

प्रभासच्या 'स्पिरिट' चित्रपटात तृप्ती डिमरीने घेतली दीपिका पादुकोणची जागा; पोस्ट शेअर करीत म्हणाली…

तृप्ती डिमरीच्या या पोस्टवर चात्यांबरोबर अभिनेता प्रभासनेही कमेंट केली आहे. ...वाचा सविस्तर
11:52 (IST) 25 May 2025

मुकुल देव यांच्या निधनाची बातमी ऐकून सलमान खान झाला भावूक; फोटो शेअर करीत म्हणाला…

सलमान खानने इन्स्टाग्राम स्टोरीवर मुकुल देव यांच्याबरोबरचा एक जुना फोटो शेअर केला आहे. ...अधिक वाचा
11:43 (IST) 25 May 2025

कान्सच्या समारोप समारंभात चमकली आलिया भट्ट; क्रिस्टल साडी नेसून पोहोचली रेड कार्पेटवर

या कार्यक्रमातील आलिया भट्टचा पहिला लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...सविस्तर वाचा
11:28 (IST) 25 May 2025

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं 'ते' ट्विट चर्चेत, म्हणाले, "माझ्या वकिलांनी…"

'हेरा फेरी ३'बद्दल परेश रावल यांचे नवीन ट्विट चर्चेत, म्हणाले, "त्यांनी माझे उत्तर..." ...अधिक वाचा
11:14 (IST) 25 May 2025

'तुला शिकवीन चांगलाच धडा' फेम भुवनेश्वरी अधिपतीबद्दल म्हणाली, "अधिपती व त्याची आईसाहेब…"

Tula Shikvin Changlach Dhada fame Actors Express Gratitude: मालिका संपताना कविता मेढेकरांचे शिवानी रांगोळे व हृषिकेश शेलार यांच्याबाबत वक्तव्य; म्हणाल्या… ...वाचा सविस्तर
10:30 (IST) 25 May 2025

राजकुमार रावच्या 'भूल चूक माफ'चा दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, केली 'इतक्या' कोटींची कमाई

'भूल चूक माफ' या चित्रपटाला लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. ...वाचा सविस्तर
10:26 (IST) 25 May 2025

'चल भावा सिटीत'मध्ये तिकिट टू फिनाले कोणाला मिळणार?

'चल भावा सिटीत' हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. जिंकण्यासाठी स्पर्धकांमध्ये चढा-ओढ सुरू आहे. सध्या तिकिट टू फिनाले मिळवण्यासाठी स्पर्धक धडपड करत असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/DKD6U8WuzMy/?utm_source=ig_web_copy_link

10:05 (IST) 25 May 2025

प्रभासच्या 'स्पिरिट' चित्रपटातून दीपिका पादुकोणची एक्झिट; 'या' बॉलीवूड अभिनेत्रीची लागली वर्णी

संदीप रेड्डी वांगा यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'स्पिरिट'मधून अभिनेत्री दीपिका पादुकोण बाहेर पडली आहे. दीपिकाऐवजी अभिनेत्री तृप्ती डिमरी आता चित्रपटात दिसणार आहे.

तृप्तीने याआधी संदीप रेड्डी वांगा यांच्याबरोबर 'अॅनिमल' या चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना प्रभास व तृप्ती डिमरीला एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे. भूषण कुमार यांच्या प्रॉडक्शन हाऊस टी-सीरीजने सोशल मीडियावर तृप्तीच्या कास्टिंगची घोषणा केली आहे.

 suniel shetty

अभिनेता सुनील शेट्टी(फोटो सौजन्य इंडियन एक्सप्रेस)

मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या..