मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. तो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ जाधवचे एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित झाले. त्याचा ‘तमाशा लाईव्ह’, ‘दे धक्का २’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. नुकतंच सिद्धार्थने चला हवा येऊ द्या कार्यक्रमात पोस्टमनचं पत्र लिहिणारे प्रसिद्ध लेखकाबद्दल पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

सिद्धार्थ हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी त्याच्या चाहत्यांना विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अपडेट देत असतो. नुकतंच सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्याला त्याने हटके कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : Exclusive : ‘मी शूटींग बंद करतोय…’ म्हणत सिद्धार्थ जाधववर संतापले महेश मांजरेकर, वाचा नेमकं काय घडलं?

“अरविंद जगताप .. लेखक म्हणून उत्तमच आहे.. हे सगळ्यांनाच माहीत आहे..पण माणूस म्हणून पण कमाल आहे… आज अचानक भेट झाली.. पण भेटीतला आपलेपणा मला खुप भावला… भावा ही तुझ्यासाठी “गोष्ट छोटी” असेल.. पण माझ्यासारख्या तुझ्या फॅनसाठी “डोंगराएवढी” आहे… लव्ह यू भावा….”, असे सिद्धार्थ जाधवने म्हटले आहे. त्यासोबत त्याने #writer, #fanmoment #आपलासिध्दू #siddhumoments असे अनेक हॅशटॅग शेअर केले आहेत.

आणखी वाचा : “मी आणि सिद्धार्थ जाधव १० वर्षे एकमेकांशी बोलत नव्हतो आणि श्रीदेवींच्या निधनानंतर…” सोनाली कुलकर्णीने सांगितला किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरविंद यांनी चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून प्रेक्षाकांची मनं जिंकली. त्याचप्रमाणे अरविंद जगताप यांची ‘मी पुन्हा येईन…’ ही वेब सीरिजही प्लानेट मराठीवर प्रदर्शित झाली आहे. यात भारत गणेशपुरे, सयाजी शिंदे यांच्यासह तगड्या कलाकारांनी काम केलं. तर दुसरीकडे सिद्धार्थ जाधव हा स्टार प्रवाहवरील आता ‘होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमात निवेदक म्हणून काम करत आहे. सध्या हा शो चांगलाच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. यात त्याच्या हटके स्टाईलने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच लवकरच तो एका हिंदी चित्रपटातही झळकणार आहे.