मिस युनिव्हर्सचा किताब जिंकलेली बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन आज तिचा वाढदिवस साजरा करत असते. ती कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. ती तिच्या चित्रपटाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. सुश्मिता सेन ही ४७ वर्षांची झाली आहे. या निमित्ताने सोशल मीडियावर लोक तिला शुभेच्छा देत आहेत. सेलिब्रिटीजनीदेखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

सुश्मिता लवकरच ‘ताली’ या वेबसीरिजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ती एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. गौरी सावंत या ट्रान्सजेंडर समजसेविकेच्या जीवनावर ही सीरिज बेतलेली असून मराठी दिग्दर्शक रवी जाधव हा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. नुकतंच रवी जाधव यांनीही सुश्मिताला शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा : इंटरव्हल नसलेल्या पहिला भारतीय हॉरर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; नयनतारा, अनुपम खेर मुख्य भूमिकेत

रवी यांच्या पाठोपाठ याच सीरिजमध्ये भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री हेमांगी कवीनेसुद्धा सुश्मिता सेनला शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे. हेमांगीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सुश्मिताबरोबरचा एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. ‘ताली’ सीरिजच्या शूटिंगदरम्यानचा हा व्हिडिओ असण्याची शक्यता आहे.

पोस्टमध्ये हेमांगीने “माझ्या दुर्गाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा” असं लिहीत तिने सुश्मिताबरोबरचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हेमांगीने सुश्मिताला फुलं भेट देऊन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, इतकंच नाही तर हेमांगीने सुश्मिताचे चरणस्पर्श करून तिचे आशीर्वादही दिले आहेत. यावेळेस हेमांगी आणि सुश्मिता दोघीही भावूक झाल्या आहेत. सुश्मिताने हेमांगीला आलिंगन देत “खूप खुशीत रहा” असा आशिर्वाद दिला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ताली’ ही वेब सीरिज वूट सिलेक्ट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सीरिजद्वारे गौरी सावंतच्या आयुष्यातील विविध पैलू प्रेक्षकांसमोर मांडले जाणार आहेत. या वेबसीरिजची निर्मिती अर्जुन सिंग बारान आणि कार्तिक डी निशंदर करत आहेत.