गेल्यावर्षी आर्यन खान ड्रग केस चांगलीच गाजली. या केसवर काम करणारे आणि याचा तपास करणारे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर या प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आले. नंतर या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं आणि क्रांती रेडकरच्या पतीवर बरेच आरोप करण्यात आले. आता पुन्हा क्रांती चर्चेत आहे. यावेळी कारण मात्र वेगळं आहे.

‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार नुकतंच मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्या घरी चोरी झाल्याचं उघडकीस आलं आहे. क्रांतीच्या अत्यंत मौल्यवान अशा साडेचार लाखाच्या हातावर घातलं जाणारं घडयाळ चोरीला गेलं आहे. मुंबईच्या गोरगाव पोलिस स्थानकात नुकतंच याविषयी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आणखी वाचा : “मला सेक्सी आजी म्हणून…” बिपाशा बासूने व्यक्त केली मनातली सुप्त इच्छा

क्रांतीच्या घरात एक मोलकरीण काम करत होती, बरेच दिवस त्यांना हिच्यावर शंका होती. या चोरीनंतर मोलकरीण पसार झाल्याचंही स्पष्ट झालं आहे. यामुळेच तिच्यावर संशय घेत ही चोरी तिने केल्याचाच क्रांतीने आरोप केला आहे. क्रांतीच्या तक्रारीच्या आधारावर पोलिस तपास करत आहेत आणि त्या मोलकरणीला ज्या संस्थेने नोकरी दिली होती तिचा तपास सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घड्याळाची चोरी ही खरंतर खूप दिवसांपूर्वी झाली होती, पण ही बाब आत्ताच लक्षात आल्याने याबद्दल ५ जानेवारीला तक्रार नोंदवली गेल्याचं सांगण्यात येत आहे. मोलकरीण उत्तर प्रदेशला गेल्याने पोलिस तिला पकडण्यासाठी उत्तर प्रदेशकडे रवाना झाले आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकर मध्यंतरी चित्रपटसृष्टीपासुन दूर होती मात्र ती आता पुन्हा सक्रिय झाली आहे. अभिनेत्रीला दिग्दर्शिका म्हणून आपण बघितले आहे. आता ती निर्माती म्हणून लवकरच आपल्यासमोर येणार आहे.