बहीण भावाच्या अतूट नात्याचे दर्शन घडवणारे ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटक गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. हे नाटक मराठी नाट्य रसिकांच्या पसंतीस उतरले होते. या नाटकाचे अनेक प्रयोग हे हाऊसफुल झाले होते. आता ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचा ३५० वा प्रयोग होणार आहे. यानिमित्ताने अभिनेत्री प्रिया बापटने एक पोस्ट शेअर केली आहे.

प्रिया बापटने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यात नाटकातील कलाकार, लेखक आणि तंत्रज्ञ मंडळी पाहायला मिळत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना प्रिया बापटने कलाकारांचे आभार मानले आहेत.
आणखी वाचा : “मला लोक होम-ब्रेकर म्हणतात, पण…”; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या पहिल्या पत्नीबद्दल प्रिया बेर्डेंचे स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या “तेव्हा प्रेमात…”

chala hawa yeu dya fame bharat ganeshpure entry in zee marathi shiva serial
‘चला हवा येऊ द्या’ संपल्यावर लोकप्रिय अभिनेत्याची ‘झी मराठी’च्या ‘शिवा’ मालिकेत एन्ट्री, पाहा प्रोमो
star pravah man dhaga dhaga jodte nava jogwa fame smita tambe entry
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत ‘जोगवा’ फेम अभिनेत्री घेणार एन्ट्री, साकारणार ‘ही’ भूमिका, जाणून घ्या…
Zee Natya Gaurav 2024 full list of winners
झी नाट्य गौरव २०२४ : प्रिया-उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ नाटकाने मारली बाजी, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम

प्रिया बापटची पोस्ट

“आज “दादा एक गुडन्यूज आहे” या नाटकाचा ३५० वा प्रयोग आहे. Formality नाही पण खरचं नाटक बसवतानाच्या अडचणींपासून ते कोव्हिड, मग खूप houseful चे बोर्ड, नवीन कलाकारांची entry, नवीन नाटकामुळे याच्या प्रयोगात पडलेला खंड, या सगळ्यातून बाहेर पडून हे नाटक ३५० चा टप्पा गाठतय.

कल्याणीचं @kalyanipathare पहिलं नाटकं, नंदू सरांबरोबर आमची पहिली निर्मिती, अद्वैत @adwaitdadarkarofficial आणि सर्व टिमचं या नाटकावरच प्रेम हे सगळचं खूप special आहे. त्यासाठी सर्वांना खूप प्रेम आणि खूप Thank you! ही टिम खूप Special आहे आणि हे नाटकही कायम Most special राहील”, असे प्रिया बापटने म्हटले आहे.

आणखी वाचा : “एक नवी स्वप्नवत सुरुवात…”, ऋता दुर्गुळेने चाहत्यांना दिली मोठी गुडन्यूज

दरम्यान ‘दादा एक गुडन्यूज आहे या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, आरती मोरे, ऋषी मनोहर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे प्रिया बापटने या नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे. सोनल प्रॉडक्शन निर्मित, अद्वैत दादरकर दिग्दर्शिन केले आहे. तर नाटकाचे लिखाण कल्याणी पाठारे यांनी केले आहे.