नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बरेच मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत आणि आले आहेत. ‘फसक्लास दाभाडे’, ‘मिशन अयोध्या’ हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तसंच आता लवकरच ‘इलू इलू १९९८’ आणि ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हे दोन्ही चित्रपट ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहेत. यामधील एका चित्रपटामध्ये बॉलीवूड अभिनेता आमिर खानला काम करण्याची इच्छा होती. आमिरने या मराठी चित्रपटाचं आणि दिग्दर्शकाचं भरभरून कौतुक केलं.

आमिर खानने ज्या चित्रपटाचं कौतुक केलं त्याचं नाव आहे ‘इलू इलू १९९८’. अजिंक्य फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू १९९८’ चित्रपटाचा नुकताच प्रिमिअर सोहळा पार पडला. या सोहळ्याला आमिर खानने खास उपस्थिती लावली होती. तेव्हा आमिर खानने ‘इलू इलू १९९८’ आणि दिग्दर्शक अजिंक्य फाळकेचं कौतुक केलं. विशेष म्हणजे यावेळी आमिर खानने मराठीत संवाद साधला.

आमिर खान म्हणाला की, मी दीड वर्षांपूर्वी हा चित्रपट बघितला होता. मला हा चित्रपट खूप आवडला आणि माझ्या असं मनात आलं की, मला पण या चित्रपटामध्ये सहभागी व्हायचं आहे. पण ते झालं नाही. मी खूप व्यग्र होतो. पण जेव्हा एलीने मला विचारलं, तेव्हा मी भेटलो. खूप भारी चित्रपट आहे. चित्रपटाची कथा हृदयाला स्पर्श करणारी आहे. अजिंक्यने दिग्दर्शक म्हणून खूप छान काम केलं आहे.

पुढे आमिर खान म्हणाला, “मी अजिंक्यला विचारलं होतं, तुला या चित्रपटासाठी पैसे कोणी दिले. तर म्हणाला, वडिलांनी पैसे दिले.” त्यानंतर आमिर खानने अजिंक्य फाळकेच्या आई-वडिलांना स्टेजवर बोलावून घेतलं. मग आमिर म्हणाला, “यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तुमचे आशीर्वाद कायम त्याच्याबरोबर असू देतं. तुम्ही त्याच्यावर जो विश्वास दाखवला. त्यामुळे त्याने खरंच खूप छान चित्रपट केला आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘इलू इलू १९९८’ चित्रपटात बरेच कलाकार मंडळी आहेत. बॉलीवूड अभिनेत्री एली अवराम, निशांत भावसार, मीरा जग्गनाथ, श्रीकांत यादव, वीणा जामकर, अंकिता लांडे असे बरेच कलाकार या चित्रटात महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.