‘पुढचं पाऊल’, ‘अग्निहोत्र’ या मालिकांमुळे अभिनेता आस्ताद काळे घराघरांत लोकप्रिय झाला. यानंतर त्याने ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभाग घेतला होता. त्याची पत्नी स्वप्नाली पाटील ही देखील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. हे दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. आपल्या जीवनातील प्रत्येक अपडेट्स ते चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. सध्या आस्ताद व स्वप्नाली दोघेही पॅरिस सफर करण्यासाठी परदेशात गेले आहेत.

स्वप्नालीने २५ मार्च रोजी तिचा वाढदिवस पॅरिसमध्ये साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने हे दोघे नवरा-बायको परदेशात फिरायला गेले आहेत. या ट्रिपचे सुंदर फोटो आस्तादने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परंतु, या सगळ्यात अभिनेत्याने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा : “खोट्या पोस्टकडे लक्ष देऊ नका…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल प्रसाद ओकची प्रतिक्रिया; म्हणाला…

गेल्या काही दिवसांत विमानप्रवास करताना अनेक बड्या अभिनेत्यांना मनस्ताप सहन करावा लागल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. असाच काहीसा अनुभव आस्तादला पॅरिसमध्ये आला. फ्रान्समध्ये नामांकित विमानकंपनीतून प्रवास करताना अभिनेत्याला नेमका काय अनुभव आला याचा खुलासा त्याने पोस्टद्वारे केला आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : अर्जुनला रंग लावणार प्रिया अन् सायलीचा होणार संताप! भर कार्यक्रमात धक्का मारून सुनावणार खडेबोल, पाहा प्रोमो

“नामांकित विमानकंपनीतून पॅरिस ते मार्सेल हा प्रवास करताना माझी बॅग पॅरिसला एअरक्राफ्टमध्ये लोड केलीच नाही. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे.” अशी पोस्ट शेअर करत आस्तादने संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली असून काही नेटकऱ्यांनी “तू ट्रेनने प्रवास केला पाहिजे होता” असा सल्ला अभिनेत्याला दिला आहे.

हेही वाचा : Video : शाहरुख खानच्या लोकप्रिय गाण्यावर प्रसाद जवादे व अमृता देशमुखचा जबरदस्त डान्स; म्हणाले, “गोड मानून घ्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
aastad
आस्ताद काळेची फेसबुक पोस्ट

दरम्यान, आस्ताद-स्वप्नालीबद्दल सांगायचं झालं, तर ‘पुढचं पाऊल’ या मालिकेच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती. सुरुवातीला त्यांच्यात प्रचंड भांडणं झाली. परंतु, हळुहळू या भांडणांचं रुपांतर प्रेमात झालं. काही वर्षे डेट केल्यावर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. याआधी ‘बिग बॉस मराठी’मध्ये आस्तादने स्वप्नालीबरोबरच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं होतं.