मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर ‘टर्री’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या ललित या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत असून अभिनेत्री गौरी नलावडेने प्रमुख नायिकेची भूमिका साकारली आहे. ‘टर्री’ चित्रपटातील गाणी प्रदर्शित करण्यात आली असून त्याला प्रेक्षकांनीही पसंती दर्शविली आहे. या चित्रपटातील ‘क्षण हळवा’ गाण्यात गौरी व ललितच्या रोमान्सची झलक पाहायला मिळाली होती.

गौरी व ललितने या गाण्यात किसिंग सीन्सही दिले आहेत. याबाबत ललितने भाष्य केलं आहे. ‘कलाकृती मीडिया’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ललितला चित्रपटातील किसिंग सीनबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ललित गमतीशीर पद्धतीने म्हणाला, “मला हे सवयीचे आहे”. त्यानंतर ललित किसिंग सीनबाबत भाष्य करत म्हणाला, “सिनेमातील त्या दोन पात्रांचा तो पहिला किस दाखवण्यात आला आहे. किसिंग सीन देण्यामागे अनेक गोष्टी असतात. नुसतं स्क्रीनसमोर आलं आणि किसिंग सीन दिला असं होत नाही. चित्रपटातील किसिंग सीन बघताना लोकांनाही छान वाटलं पाहिजे.ते प्रेक्षकांच्या अंगावर येता कामा नये”.

हेही वाचा>> Video: लिपलॉक, रोमान्स अन्…; ‘टर्री’ चित्रपटातील नवीन गाण्यात ललित प्रभाकर व गौरी नलावडेचा रोमँटिक अंदाज

ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत असलेला ‘टर्री’ हा चित्रपट येत्या १७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. महेश काळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ललित एक नवी भूमिका घेऊन या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक अनोखी लव्हस्टोरी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा>> स्मृती इराणींच्या होणाऱ्या जावयाचं अ‍ॅपल कंपनीशी खास कनेक्शन, NRI अर्जुन भल्लाबाबत जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ललितने अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच मनोरंजन विश्वात स्वत:ची ओळख निर्माण केली. त्याने नाटक, मालिका यामध्ये काम केलं आहे. छोट्या पडद्यावरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेमुळे ललित घराघरात पोहोचला. ‘आनंदी गोपाळ’, ‘झोंबिवली’ यांसारख्या चित्रपटातील त्याने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.