आतापर्यंत अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम करत अभिनेत्री अमृता खानविलकर प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. फक्त मराठीच नाही तर हिंदी मनोरंजन सृष्टीत देखील तिने स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. तिच्या कामाचे लाखो चाहते आहेत. अभिनय क्षेत्रात तिने चांगलंच नाव कमावलं आहे. आता अभिनेत्री नसती तर ती कोण असती हे तिने सांगितलं.
अमृता खानविलकर विविध माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. तिचं फॅन फॉलोईंग खूप मोठं आहे. तिच्या अभिनयाचं आणि नृत्याचं सर्वच जण कौतुक करत असतात. पण ती जर या क्षेत्रात नसती तर तिने कुठल्या क्षेत्रात काम केलं असतं हे तिने नुकतंच ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.
आणखी वाचा : “…तर त्यांनी शो सोडावा,” ‘मास्टरशेफ इंडिया’वर प्रेक्षक नाराज, जाणून घ्या नेमकं काय घडलं
ती म्हणाली, “आतापर्यंत मला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. पण जर मी अभिनेत्री नसते तर मी एक फिटनेस ट्रेनर किंवा नृत्य दिग्दर्शक म्हणजेच डान्स ट्रेनर असते.” आता तिच्या या उत्तराने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.
हेही वाचा : “मला तुझा खूप अभिमान आहे,” माधुरी दीक्षितने केले अमृता खानविलकरचे कौतुक
अमृता खानविलकर फिटनेस फ्रिक देखील आहे. ती नियमितपणे व्यायाम करते, त्याचप्रमाणे तिच्या आहाराकडे ही व्यवस्थित लक्ष देत असते. अभिनयाबरोबरच ती उत्कृष्ट नृत्यांगना आहे हे देखील आपल्या सर्वांनाच माहित आहे. काही महिन्यांपूर्वी ती ‘झलक दिखला जा’ कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती आणि तिच्या नृत्याचं माधुरी दीक्षितनेही भरभरून कौतुक केलं होतं. त्यामुळे ती नृत्यदिग्दर्शक किंवा फिटनेस ट्रेनर झाली असती तरीही तिने स्वतःचं नाव तितकंच मोठं केलं असतं जितकं अभिनेत्री म्हणून तिने केलं आहे.