काही चित्रपट अनेक वर्षांनंतरही प्रेक्षक म्हणून आपल्या मनात कायम घर करुन राहतात. यातील कलाकार, संवाद, गाणी यांची वर्षानुवर्षे चर्चा होत असते. असाच एक मराठी चित्रपट म्हणजे अशी ही बनवाबनवी. हा चित्रपट आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने बघतात. या चित्रपटात सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ आणि अश्विनी भावे या अभिनेत्री झळकल्या. पण यातील एका भूमिकेसाठी किशोरी शहाणे यांना विचारणा करण्यात आली होती. पण त्यांनी या चित्रपटाला नकार दिला. त्याबद्दल त्यांनी आता भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : किशोरी शहाणेंनी ‘ते’ एक वाक्य म्हणताच थेट लग्नाला तयार झाले दिपक विज; जाणून घ्या अभिनेत्रीची रंजक लव्ह स्टोरी

‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट १९८८ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाने इतिहास रचला. या चित्रपटाने उत्कृष्ट कमाई तर केलीच पण प्रेक्षकांच्या मनातही घर केलं. सचिन निवेदिता, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सिद्धार्थ रे, सुधीर जोशी, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे, अश्विनी भावे असे अनेक नामवंत कलाकार या चित्रपटात झळकले. या चित्रपटासाठी आधी सचिन पिळगावकर यांनी किशोरी शहाणे यांना विचारणा केली होती. मात्र त्यांनी हा चित्रपट नाकारला.

हेही वाचा : “त्या काळी आमच्यात स्पर्धा होती पण…,” सचिन पिळगांवकरांनी उलगडलं महेश कोठारेंबरोबरचं नातं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्या याबद्दल म्हणाल्या, “माझी टीवाय बी.कॉमची परीक्षा सुरू होती आणि मला सचिनचा फोन आला की आपण ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपट करत आहोत. तेव्हा मी त्याला म्हटलं होतं की मी परीक्षा सोडून येऊ शकत नाही. आपण तारखांमध्ये काही बदल करू शकतो का? तेव्हा ते मला म्हणाले की आपण तारखांमध्ये बदल नाही करू शकत. त्यामुळे या चित्रपटात काम करण्याची माझी संधी हुकली. तेव्हा मला या चित्रपटात काम करू न शकल्याबद्दल खूप दुःख झालं. आजही मला या चित्रपटाचा भाग होता आलं नाही याचं मला वाईट वाटतं.”