अभिनेत्री रिंकू राजगुरु ‘सैराट’ चित्रपटातून घराघरांत पोहोचली. आज या चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल सात वर्ष उलटून गेली तरीही सामान्य लोक तिला ‘आर्ची’ याच नावाने ओळखतात. चित्रपटांप्रमाणे मराठी कलाविश्वात नाटकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. नुकतेच रिंकूने तिच्या आयुष्यातील पहिले नाटक पाहिले. हे नाटक नेमके कोणते होते? याबद्दल जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Akelli Trailer : युद्धग्रस्त इराकमध्ये अडकलेल्या भारतीय मुलीची कहाणी, ‘अकेली’चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर

रिंकू राजगुरुने नाट्यगृहातील काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देत रिंकू लिहिते, “माझ्या आयुष्यातील मी पाहिलेलं पहिलं नाटक. अप्रतिम अनुभूती…सगळ्याच अंगाने सर्वांगसुंदर असं नाटक आहे ‘देवबाभळी’. प्राजक्त आणि सगळ्या टीमला खूप शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन.”

हेही वाचा : नितीन देसाई अनंतात विलीन! त्यांच्या स्वप्नमयी ND स्टुडिओतच कुटुंबियांनी दिला अखेरचा निरोप

प्रेक्षकांच्या लाडक्या आर्चीने ‘देवबाभळी’ हे नाटक पहिल्यांदा नाट्यगृहात पाहिल्याचे म्हटले आहे. ‘संगीत देवबाबळी’ या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. नाट्यरसिकांचे या नाटकाला भरभरून प्रेम मिळत आहे. रिंकूने शेअर केलेल्या फोटोंवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया देत नाटकाचे कौतुक केले आहे.

हेही वाचा : Video: आमिर खानने घेतले नितीन देसाईंच्या पार्थिवाचे दर्शन; शेवटच्या भेटीची आठवण सांगत म्हणाला, “त्यांच्या मुलीच्या लग्नाआधी…”

दरम्यान, लवकरच अभिनेत्री रिंकू राजगुरू राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या ‘खिल्लार’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये अभिनेता ललित प्रभाकर रिंकूसह प्रमुख भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress rinku rajguru shared her first drama watching experience sva 00
First published on: 05-08-2023 at 10:04 IST